सावल्यांची जुळणी

Print Friendly, PDF & Email

सावल्यांची जुळणी

(स्वास्थ्य हीच संपत्ती)

ह्या खेळात मुलांनी आकृत्या बघून त्यांच्या सावल्यांबरोबर, त्या वस्तूंशी जोड्या लावाव्यात

उद्दिष्ट:

हे उपक्रम कदाचित अतिशय सोपे दिसत असले, तरीही मुलांनी वस्तूंच्या आकाराचा व्यवस्थित अभ्यास (विश्लेषण) करायचा असतो, कारण सावल्यांमधून काहीही माहिती मिळत नाही. ह्या उपक्रमातून मुले सर्व माहितींचे सूक्ष्म निरीक्षण करतात, आणि दृश्य चित्रांमधील भेदाभेद ओळखण्याची कला वाढीस लागते.

खालील स्वास्थ्य हीच संपत्ती, या खेळात एका बाजूस काही फळांची चित्रे दिली आहेत, तर दुसऱ्या बाजूस त्या फळांच्या सावल्या दिल्या आहेत. मुलांनी फळांबरोबर त्यांच्या सावल्यांच्या जोड्या लावायच्या आहेत.

संबंधित मूल्ये :
  • चौकसबुद्धी,
  • निरीक्षण
  • कुतुहल
  • लक्ष केंद्रित करणे
  • अचूक पर्यायांची निवड.
वस्तूंची आवश्यकता:

फळांची आणि त्यांच्या प्रतिकृतींची कात्रणे

गुरुंची पूर्वतयारी:

गुरुंनी फळांची आणि त्यांच्या सावल्यांची कात्रणे तयार ठेवावीत.

खेळ कसा खेळावा:
  1. सावलीचा उपक्रम घेताना गुरु मुलांना प्रथम त्यांच्या स्वतःच्या सावल्यांचे निरिक्षण करण्यास सांगू शकतात, कारण ते त्यांना अधिक चांगले ठाऊक असते.
  2. गुरु वर्गातील मुले २ ग्रुप मध्ये विभागतात.
  3. प्रत्येक ग्रुपला प्रत्यक्ष फळांची तसेच सरमिसळ केलेल्या सावलींच्या कात्रणांचे एकत्र पाच संच देतील.
  4. मुलांनी फळांची चित्रे त्यांच्या सावल्यांच्या चित्रांशी जोडी लावावीत.
  5. जो ग्रुप कमी वेळेत जोड्या लावून पूर्ण करतो तो जिंकतो.
अधिक अभ्यासासाठी गुरुंसाठी उपयुक्त माहिती
  • उपक्रम पूर्ण झाल्यावर गुरुने सात्विक आहारचे महत्त्व आवर्जून सांगावे. फळे,भाज्या, पालेभाज्या इ. आपल्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहेत.
  • ‘दर दिवशी एक सफरचंद ठेवी डॉक्टरास दूरवर’ या लोकप्रिय वचनाचे महत्त्व गुरु समजवून सांगू शकतात.
  • ‘जसे अन्न तसे विचार’- या बाबांच्या वचनाविषयी गुरु सविस्तरपणे चर्चा करु शकतात. सात्विक अन्नामुळे आपल्या मनात सात्विक विचार येतात.
  • सूर्य परमेश्वर आहे याची गुरुंनी मुलांना माहिती द्यावी. आपण सूर्याकडे पाठ केली की आपली सावली आपल्या समोर येते आणि आपल्याला घाबरवू शकते, परंतु आपण सूर्यासमोर तोंड केले तर तसे होत नाही. म्हणून आपल्या प्रिय स्वामींना समोर ठेवावे हे सर्वात योग्य.
भिन्नता:
  1. फळे आणि भाज्या यांच्या उलट जोड्या लावणे.
  2. प्राणी आणि फुले यांच्या जोड्या लावणे.
सावल्यांवर स्वामींचे विचार

“सावली हे भौतिक मायेचे प्रतीक आहे. सूर्याच्या समोर तोंड करुन चाललात तर सावली मागे पडते. परंतु जोपर्यंत मायेच्या मागे धावता (सूर्यास पाठ करता), परमेश्वर तुमच्या दृष्टिपथापासून दूर जाईल”. — बाबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: