षड्रिपू

Print Friendly, PDF & Email

षड्रिपू

उद्दिष्ट:

मुलांना आपल्यातील अंतस्थ षड्रिपू व त्यांचे वाईट प्रभाव याबद्दल सावध करणे आणि ते सर्वतोपरी टाळण्यासाठी सूचना देणे.

संबंधित मूल्ये:
  • जागरुकता / सावधानता
  • सद्सद्विवेक
  • समयसूचकता
आवश्यक साहित्य:
  1. (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) ज्यावर यापैकी एक दोष लिहिलेला आहे, असे ६ बोर्ड तयार करणे आणि ‘देवाचा आवडता’ असे लिहिलेला एक बोर्ड करणे.
  2. वाजवण्यासाठी आवश्यक असलेले संगीत.
  3. पिसण्यासाठी आणि निवडण्यासाठी आवश्यक असलेल्या ६ छोट्या चिठ्ठ्या तयार करणे, त्यावर १,१ षड्रिपूतील दोष लिहिलेला असेल.
  4. ‘देवाचा आवडता’ असे लिहिलेली एक चिठ्ठी तयार करणे.
गुरुंसाठी पूर्वतयारी:

असे ७ बोर्ड खोलीतील भिंतीवर वेगवेगळ्या कोपऱ्यात उंचावर टांगून ठेवणे आवश्यक आहे.

खेळ कसा खेळायचा
  1. मुलांनी वर्तुळ तयार करावे आणि चालू असलेल्या संगीताच्या तालावर हळूहळू गोल पळत राहावे.
  2. संगीत थांबल्यानंतर मुलांनी ६ पैकी कोणत्याही एका बोर्ड जवळ जाऊन थांबावे.
  3. नंतर षड्रिपूंपैकी एक चिठ्ठी गुरु उचलेल. (उदा. काम)
  4. काम या बोर्ड जवळ उभी असलेली सर्व मुले बाद होतील.
  5. आता ‘काम’ लिहिलेला बोर्ड खेळातून काढून टाकायचा.
  6. अशाप्रकारे संगीताच्या तालावर खेळ पुढे चालू राहील. जेंव्हा सहापैकी षड्रिपूतील एक कार्ड शिल्लक राहील, तेव्हा ‘देवाचा आवडता’ असे लिहिलेली चिठ्ठी आणि बोर्ड खेळायला द्यावा.
  7. ‘देवाचा आवडता’ या बोर्डजवळ जो मुलगा थांबेल, त्याने षड्रिपूंना टाळले व तो त्यांच्यापासून दूर राहिला, म्हणून स्पर्धेतील या परीक्षेत तो यशस्वी झाला, असे जाहीर करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *