शिव(४) शिर्डीपुरिश्वर शम्भो शंकर सांब शिवोम्
भजनाचे बोल
- शिव(४) शिर्डीपुरिश्वर शम्भो शंकर सांब शिवोम्
- भवहर पुरहर पुट्टपर्तीश्वर शम्भो शंकर सदाशिवोम्
- ॐशिव(४) शिर्डीपुरिश्वर शम्भो शंकर सांब शिवोम्
- कैलासाचल बाल शिवा कालकूटधर बाल शिवा
- केली लालस बाल शिवा लीला तांडव बाल शिवा
अर्थ
हे शिर्डीपुरिश्वरा, आम्ही तुला शिव,परमेश्वर, शम्भो, शंकर, साई,शिवा ह्या नामांनी भजतो. तू आमचे भय आणि सांसारिक दुःख ह्यांचा नाश करतोस.
तू कैलासावर वास करतोस आणि तांडव नृत्य करण्यात तू निपुण आहेस.
स्पष्टीकरण
शिव (४) शिर्डीपुरिश्वर शम्भो शंकर सांब शिवोम् | हे नित्य मंगल भगवान शिवा,तू शिर्डीसाई बनून पृथ्वीवर अवतरलास! तू आम्हाला चिरंतन शांती आणि दिव्य आनंद प्रदान करतोस. सृष्टीच्या कणाकणातून तू प्रतिध्वनित होतोस आणि तुझा आवाज दुमदुमतो. |
---|---|
भवहर पुरहर पुट्टपर्तीश्वर शम्भो शंकर सदाशिवोम् | हे भगवान शिवा, तू पुट्टपर्तीचा ईश्वर आहेस! तू आमचाअहंकार आणि भवभय ह्यांचा नाश करून आम्हाला आनंद प्रदान करतोस.तू परम ईश्वरआहेस, ज्याची स्पंदने विश्वाच्या कणाकणात निनादतात. |
शिव (४) शिर्डीपुरिश्वर शम्भो शंकर सांब शिवोम् | हे नित्य मंगल भगवान शिवा,तू शिर्डीसाई बनून पृथ्वीवर अवतरलास! तू आम्हाला चिरंतन शांती आणि दिव्य आनंद प्रदान करतोस. सृष्टीच्या कणाकणातून तू प्रतिध्वनित होतोस आणि तुझा आवाज दुमदुमतो. |
कैलासाचल बाल शिवा कालकूटधर बाल शिवा | हे भगवान शिवा, लहान बालकासारखे निर्मल हृदय असणाऱ्यांच्या हृदयात तू तेजाने तळपतोस.समस्त मानवजातीस वाचवण्यासाठी तू प्राणघातक विष प्राशन केलेस तसेच केवळ आमच्या कल्याणासाठी, आमची अनेक दुःखं आणि वेदना स्वतःवर घेण्याचे तुझे कार्य अविरतपणे सुरु आहे. |
केली लालस बाल शिवा लीला तांडव बाल शिवा |
मनाला मोहिनी घालणाऱ्या भगवान शिवा! तू तुझ्या तांडव नृत्याने अखिल विश्वालाआनंद देतोस. |
राग: मध्यमावती(कर्नाटिक),मधुमदसारंग (हिंदुस्तानी)
श्रुती: ए (पंचम)
ताल: कहरवा किंवा आदीतालम – ८ ताल
Indian Notation


Western Notation


Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_13/01FEB15/bhajan-tutor-Shirdipureeshwara.htm