तिसऱ्या डोळ्याचे महत्व
तिसऱ्या डोळ्याचे महत्व
शिव हा परमात्म्याची लय व संहारशक्ति निर्देशित करणारा पैलू आहे. शिव व विष्णु दोघेही अंतिम वैश्विक सत्य निर्देशित करतात. शिव हा वैराग्यवृत्ति म्हणजे संपूर्ण अनासक्ती दाखवतो. भगवंताने स्वत:च्या संकल्पाने सारे विश्व पूर्णतेला नेले. स्वत:च्याच सृष्टीतील अंशभागाची तृष्णा तो बाळगीत नाही. शिव म्हणजे मंगल, तो मन्मथा माणसाच्या मनातील मोह, लोभ, मद, मात्सर्य, काम, व क्रोध या सहा वासनांचे भस्म करून टाकतो.
कैलासराणा – प्रकाश, शुचिता आणि आनंद यांच्या निवासाचा स्वामी, चंदमौळी – मस्तकावर चंद्र धारण करणारा. शिवपूजनासाठी महिन्यात शिवरात्रि येत असते. रात्रीवर चंद्राचा प्रभाव असतो. सोळा कला असतात. जेव्हा त्याचा क्षय होतो तेव्हा प्रत्येक दिवशी त्या एकेक कला कमी होते आणि अखेर अमावस्येच्या रात्री तो पूर्ण नाहीस होतो.
चंद्रक्षय हे मनः क्षयाचे प्रतीक आहे. कारण मन हे संयमित करावे लागते, आवरावे लागते आणि शेवटी नष्ट करावे लागते. हेच सर्व साधनांचे साध्य आहे. मनुष्याच्या मनाचे प्रतीक असलेला चंद्र कृष्णपक्षात दरोज क्षीण होतो आणि त्याची एक कला कमी होते. त्याचप्रमाणे मनाची शक्ती कमी कमी होते आणि शेवटी चतुर्दशीच्या रात्री अगदी थोडासा शेषभाग उरतो. म्हणून या दिवशी थोडा अधिक प्रयत्न केला तर तो शेष भागह निपटून टाकणे शक्य होते आणि मनोनिग्रह पूर्ण होतो. ती सबंध रात्र अन्न व निद्रा यांचा विचार न करता शिवाचा उपवास (त्याच्याजवळ राहणे) करीत, जप ध्यानात घालविली पाहिजे.
फणींद्रमाथा – ज्याच्या माथ्यावर सापाचा फण उभारला आहे तो. सपनि प्रतीक वापरले आहे. सर्प हा षट्चक्र व सहस्त्रार यांच्यासह असलेल्या कुंडलिनी शक्तीचे प्रतीक आहे. यातील सहस्त्रार म्हणजे त्या सर्पाचा फण होय. देवळांमध्ये सर्परूपी सुब्रह्मण्यम् पूजिला जातो. माणसाच्या नसान (Nerves) केंद्रस्थानी सुप्त असलेल्या मर्मभूत आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे. ही शक्ति जागवून माणसाने स्वत:च्या उन्नयनासाठी वा म्हणून वाट पाहात असते.
वृषभाचे महत्व
शिवाचे वाहन असलेला वृषभ सत्य, धर्म, शांति व प्रेम या चार गांवर उभ्या असलेल्या सनातन धर्माचे प्रतीक आहे.
शंभू – स्वयंभू – कोणीही निर्माण न केलेला. याचे स्त्रीलिंगी रूप शांभवी. शिव वैराग्यरूप आहे. ज्याने स्वत:च्या संकल्पाने हे विष उत्पन्न केले तो त्यातील कोणत्याही अंशभागाची हाव बालगीत नाही.
डमरूचा अर्थ:
गर्जुन केलेली स्तुति आणि गायन यांच्या साहाय्याने शिवाजवळ जाणे शक्य आहे.
त्रिशूलाचा अर्थ :
तो भूत-भविष्य – वर्तमानाचा स्वामी आहे. आपल्या भक्तांची यांत्रिकी जबाबदारी तो घेतो.
तृतीय नेत्राचा अर्थ:
तो ज्ञानचक्षु आहे. प्रभु सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान् आहे. तो भूत – भविष्य – वर्तमान जाणतो.
कारूण्यसिंधु
भगवंत कारूण्यसिंधु आहे. त्याची कृपा सागराप्रमाणे अफाट, अमर्याद आहे. तुमच्या जपध्यानाने व सद्गुणांची पद्धतशीर जोपासना करण्याने या कृपेचे ढगात रूपांतर होते आणि साधकांवर प्रेमाचा वर्षाव होतो आणि त्यातून आनंदाचे झरे व नद्या तयार होतात.
प्रभू (ईश्वर) भाव दुःख हारी आहे
तुम्हाला माहीत आहे की गरूड पक्ष्याचा सर्प हा आहार आहे. एकदा विष्णूचा गरूड शिवाला अभिवादन करण्यासाठी कैलास पर्वतावर गेला. शिवाच्या गळ्यात, बाहूंवर, मनगटावर, कमरेभोवती आणि पायांभोवती सर्प धारण केलेले असतात. जेव्हा त्या सपांनी गरूडाला पाहिले तेव्हा ते घाबरले तर नाहीतच, उलट आपल्या दुहेरी जिभा बाहेर काढून त्यांनी गरूडाला जवळ येण्याचे आव्हान दिले. प्रभूच्या सहवासाने त्यांना इतके मोठे धैर्य प्राप्त झाले होते. म्हणून आपण नित्य प्रार्थना करून वर उपदेश अनुसरून त्यांच्या सान्निध्यात राहिले तर कोणती काळजी, दुःख अथवा भय आपल्याला त्रास देऊ शकणार नाही.
[श्री सत्य साई बालविकास गुरु मार्गदर्शिका]