सीता वल्लभ

Print Friendly, PDF & Email

Compilation of Divine Discourses

रघुकुल

रघु राजा हा अतिशय कुशल आणि चांगला राजयकर्ता होता ,आणि म्हणूनच त्या संपूर्ण वंशाला त्याचे नाव दिले गेले.

स्वतः भगवान बाबांनी त्याच्या उत्तम गुणांबद्दल रामकथा रसवाहिनी मध्ये लिहिले आहे. बाबा म्हणतात तरुण असला तरी रघु राजा सद्गुणांनी समृध्द होता. कठीण समस्या असली तरी त्याला तिचे पटकन आकलन होत असे आणि ती समस्या सोडविण्याचे साधन किंवा मार्ग पण तो शोधून काढत असे. त्याने आपल्या प्रजेला नेहमी सुखी आणि समाधानी ठेवले. दुष्ट राजांना त्याने शांततेच्या मार्गाने आणि चातुर्य व युक्ती यांचा वापर करून जिंकले किंवा त्यांना जिंकण्यासाठी थोड्या सैन्याचा वापर केला किंवा कधी उघडपणे त्यांच्या विरोधात जाऊन युध्दभूमीवर त्यांच्या पराभव केला.”

सीता

माता सीता प्रकृतिचे प्रतिनिधित्व करते आणि भगवान राम हे शाश्वत, दिव्य चैतन्य आहेत ज्याच्यामधून प्रकृतिचा उदय झाला. आपले निर्मल वैभव आणि औदार्य यांनी समृध्द असलेली प्रकृति ही दिव्यत्वाचा तेवढाच भाग आहे जेवढा आपण मनुष्य आहोत. प्रकृति विना जीवनाची आपण कल्पना तरी करू शकतो का? नाही. निसर्ग निस्वार्थी आहे कशाचीही अपेक्षा न ठेवता तो आपल्याला खूप देत असतो. म्हणूनच आपण निसर्गाचे आपल्या फायद्यासाठी शोषण न करता त्याचे सर्वतोपरि रक्षण केले पाहिजे. कधीकधी अचानक जगावर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती येऊन कोसळतात आणि त्या आपत्ति म्हणजे आपण प्रकृतिने दिलेल्या विविध देणग्यांचा आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर करू नये म्हणून प्रकृतीचा आपल्याला इशारा देण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा पर्यावरणाचे योग्य ते संतुलन राखले जाते तेव्हा निसर्गाचा कोप क्वचितच होतो.

सीता वल्लभ

भगवान बाबा हे खरोखरीच प्रकृतिचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सीतामातेचे प्रिय स्वामी श्रीरामच आहेत हे दाखविण्यासाठी पुढे एक प्रसंग दिला आहे. चेन्नईच्या दक्षिणेला ७० की.मि. वर मदुरत्नकम नावाचे छोटेसे गांव आहे. या गावाशी निगडित एक प्रसिध्द दंतकथा आहे. असे सांगितले जाते की सीतेच्या शोधत असताना स्वतः भगवान श्रीराम या गावी आले होते. गावाला लागूनच खूप मोठे तळे आहे. आणि येथे आले असताना श्रीरामांनी या तळ्यात अंघोळ केली असे म्हणतात. नंतरच्या काही वर्षात येथे श्रीरामांचे मंदिरही बांधले गेले.

साधारण १७९५ मध्ये बंगालच्या उपसागरात खूप कमी दाबाचा पत्ता निर्माण झाला आणि त्यामुळे मदुरत्नकममध्ये आणि आसपासच्या भागात प्रचंड पाऊस पडला. त्यावेळचे कलेक्टर कर्नल प्राईस यांना इशारा मिळाला की तलाव भरला असून लवकरच धोका संभवू शकतो,ज्यामुळे आसपासच्या घरांचे आणि मालमत्तेचे खूप नुकसान होऊ शकते. प्राईस यांनी मदरटत्नकमचा रस्ता धरला. येऊन तलावाची पाहणी केली. भगदाड बुजविण्यास सांगितले आणि मग त्यांनी रामाच्या मंदिरात जाण्याचे ठरविले. मंदिरात प्रवेश करताक्षणीच त्यांच्या लक्षात आले की मंदिर अगदी मोड़कलीस आले आहे. आजूबाजूला बघितल्यावर एका कोपऱ्यात त्याला विटांचा खूप मोठा ढीग दिसला. चौकशी केल्यावर मंदिराच्या पुजार्याने त्यांना सांगितले की त्या विटा सीतामातेचे मंदिर उभारण्यासाठी आणल्या आहेत परंतु पैसा नसल्याने बांधकाम होऊ शकले नाही. वादळामध्ये त्या प्रचंड तळ्यातला नेहमी भगदाड पडायची आणि आजूबाजूच्या लोकांचे खूप नुकसान व्हायचे, त्यामुळे मंदिरासाठी पैसा उभारणे त्यांना शक्य होत नसे. मग कर्नल प्राईस यांनी विचारले,”तुमचा राम कसा येत नाही तुमच्या मदतीला? तो का नाही तळ्याचे रक्षण करत ज्यामुळे त्याच्या पत्नीसाठी मंदिर बाँधणे तुम्हाला शक्य होईल.” मंदिराच्या अधिकाऱ्यांना खूप वाईट वाटले आणि ते म्हणाले, “पुढच्या वेळेस आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर श्रीराम आमच्या मदतीला आल्याचे तुम्हाला नक्कीच दिसेल.”

त्यानंतर काहीच दिवसांनी तेथे प्रचंड पाऊस पडला आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली. कर्नल प्राइसने पुन्हा मदरत्नकमला धाव घेतली. त्या भयंकर वादळाचे उग्र रूप पाहिले आणि निसर्गाचा प्रकोप पाहून त्यांना धक्काच बसला. आता केवळ परमेश्वरच आपला आश्रय आहे असे त्यांना वाटले. ते असा विचार करत असतानाच मंदिरात आश्रय घेत असलेली गावकऱ्यांची खूप मोठी गर्दी दिसली. त्यामधील एक वृद्ध माणूस श्रीराम, श्रीरामांचा महिमा, त्यांची शक्ति याबद्दल निरंतर बोलत होता. जरी ख्रिश्चन असले तरी त्या क्षणी कर्नल प्राईस यांनी मनोमन प्रार्थना केली,” ते म्हणतात तू महान आहेस. तसे असेल तर तू आमच्या सगळ्यांचे रक्षण कर. तू जर माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद दिलास तर मी येथे तुझ्या पत्नीचे मंदिर बांधीन. “कर्नल प्राईस यांनी आपली प्रार्थना संपवली आणि त्याच क्षणी वीज चमकली आणि कर्नल प्राईस यांना स्मितहास्य करणाऱ्या राम-लक्ष्मणांचे दर्शन झाले. ते केवळ उद्गारले,” तेथे पहा! अणि ते बेशुध्द पडले. शुध्दीवर आल्यावर त्यांनी पाहिले की ते त्यांच्या खोलीतील आरामदायी पलंगावर झोपले आहेत. चमत्कार व्हावा त्या प्रमाणे पाऊस पडायचा थांबला आणि तलावामधील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या खाली आहे हे ऐकून त्यांना बरे वाटले. अशा नाट्यमय रीतीने भगवंत त्यांच्या मदतीला धावून आला म्हणून कर्नल प्राईस यांच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. केवळ कर्नल प्राइसच नाही तर मदुरत्नकम मधील सर्व गावकऱ्यांना समजले की भगवान रामच त्यांच्या मदतीला धावून आला होता. आजही मंदिरातला देव राम म्हणून नाही तर तलावाचे रक्षण करणारा राम म्हणून ओळखला जातो. या सुंदर प्रसंगातून हे दिसून येते की भगवंतच प्रकृतिचा प्रिय स्वामी आहे. म्हणून त्याला सीता-वल्लभ म्हणणे योग्य ठरेल. या संदर्भानुसार सीता प्रकृतिचे प्रतिनिधित्व करते.

[SOURCE: http:// media.radiosai.org/journalef.vol_03/10Oct 01/katrina.htm]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: