वाद्य संगीत
वाद्य संगीत
उद्दिष्ट:
वाद्य संगीत हे सर्वमान्य आहे कारण ते भाषांच्या आणि धर्माच्या पलिकडे आहे. संशोधनाने हे सिध्द केले आहे की वाद्यसंगीताचा आपल्या शरीर आणि मनावर खोल परिणाम होतो. मनःशांती तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सेचा प्रयोग केला जातो.
भारतात संगीत विशेषतः वाद्य संगीत हे बहुधा आध्यात्मिकतेशी जोडले गेले आहे, ह्याचे कारण असे की, बहुतेक हिंदु देवतांचा कोणत्यातरी वाद्याशी संबंध आहे.
मुले बालविकासमध्ये देव-देवतांविषयी शिकत असल्यामुळे ते देव-देवता ओळखतात. वाद्यसंगीत हा एक उत्कंठावर्धक उपक्रम आहे. याद्वारे मुले देव-देवतांची छबी आठवून त्यांचा वाद्याशी असलेला संबंध जोडतील.
संबंधित मूल्ये
- निरिक्षण
- स्मरणशक्ती
- भिन्नता ओळखणे
वस्तूंची आवश्यकता
संगीत वाजवणे
गुरुने करायची पूर्वतयारी :
गुरुने खाली दिलेल्या सहा वाद्यांचे ध्वनी तयार ठेवावेत.
- शिव-डमरु
- विष्णु -शंख
- कृष्ण- बासरी
- सरस्वती- वीणा
- नारद -करताल
- नन्दी – मृदंग
खेळ कसा खेळावा
- मुलांना जोडीत बसवणे.
- प्रत्येक जोडीस एका वाद्याचे नाव/चित्र असलेला कागद द्यावा.
- गुरुने एका वाद्याचा ध्वनी सुरु करावा. (उदा. -डमरु)
- मुलांनी त्या वाद्याशी संबंधित देवाचे नाव सांगावे. सहाय्य करु शकता. (उदा.- डमरुचा आवाज) (उत्तर- भगवान शंकर)
- अशाप्रकारे इतर वाद्यांचे ध्वनी ऐकून देवतांची नावे सांगावीत.
- प्रत्येक अचूक उत्तरास गुण द्यावेत.
- जी जोडी जास्त उत्तरे देतील ती जोडी विजयी होईल!
- मधूनमधून खेळ जास्त आकर्षक करण्यासाठी वाद्याचे चित्र न देता ध्वनी ऐकवून त्यावरुन देव-देवतांचे नाव ओळखणे.
भिन्नता:
विशिष्ट देवासोबत त्याची देवी, वाहन, मंदिर यांची जोडी लावणे.
गुरुंसाठी सूचना:
अभ्यास अधिक समर्पक होण्यासाठी गुरु मुलांना खालीलप्रमाणे संकल्पना शिकवू शकतात.
- ध्वनी लहरींचे महत्त्व- नादब्रह्म
- वाद्याचा गर्भितार्थ; बासरी- पोकळ आणि अहंकार रहित. शंख- शुभ प्रसंगी तसेच युद्धापूर्वी वाजवला जातो.
- शंखांची नावे: कृष्ण- पांचजन्य, अर्जुन- देवदत्त
- वाद्यसंगीताचे भाग- तार
- आपल्या भजनात वाद्य वाजवल्यामुळे ताल घेतला जातो, मनःशांती लाभते.
- प्रसिध्द वादकांची नावे- (हरिप्रसाद चौरसिया इ.)
- वरील विषयांवर चर्चासत्र घेतल्याने बालविकास मनोरंजक होईल तसेच मुलांना देव-देवतांचा वाद्यांशी संबंध जोडण्यास सहाय्य होईल.