पेरणे आणि वाढवणे
पेरणे आणि वाढवणे
उपक्रमाचे उद्दिष्ट – ब्रह्मा हे जगाचे सृजन करतात, विष्णु पालन करतात व शिव संहार करतात बालविकास ग्रुप १ च्या मुलांना सृजन, पालन व संहार ही संकल्पना समजावून देणे.
साहित्य – मातीची कुंडी किंवा एखादी खोलगट ताटली किंवा ट्रे -सिरेमिक, माती किंवा पत्र्याचा डबा, खत, नाचणी, मोहरी बियाणे इ.
कृती
- वर्गामधील मुलांच्या संख्येनुसार ३ ते ४ मुलांचा एक गट – असे गट बनवा.
- प्रत्येक गटास कुंडी वा ट्रे द्या.
- प्रत्येक गटास कुंडीवर त्यांचे लेबल लावण्यास सांगा व लेबलवर गटाचे नाव व बियाचे नाव लिहिण्यास सांगा.
- त्यांना त्यांच्या कुंड्यांमध्ये खत, माती भरण्यास सांगा.
- त्यानंतर बिया लावण्यपूर्वी कुंडीत पाणी घालण्यास सांगा.
- मुलांना वेगवेगळ्या बियांचे प्रकार, आकार, रंग इ. चे निरिक्षण करण्यास सांगा.
- बीजाला अंकुर फुटुन त्याचे सुंदर रोपात रूपांतर होण्यासाठी ज्या गोष्टी द्याव्या लागतात त्याची चर्चा करा..
- प्रत्येक गटास बियांची संख्या मोजून, त्यांच्या कुंडीत पेरायला सांगा व त्यानंतर पुन्हा कुंडीत पाणी शिंपडण्यास सांगा.
- प्रत्येक गटास त्यांची कुंडी खिडकीजवळ व अशा ठिकाणी ठेवायला सांगा जेथे पुरेसा सूर्यप्रकाश येतो.
- गटातील प्रत्येक मुलावर आळीपाळीने त्या रोपांची देखरेख करण्याचे काम सोपवा. त्याने योग्य प्रमाणात रोपाला पाणी घालणे, रोपाला वाढीसाठी योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो आहे ना ह्याची खात्री करणे इ. काळजी घेतली पाहिजे.
- ह्या सर्व प्रक्रियेत गुरुंनी त्यांना मार्गदर्शन करावे. तण काढण्याविषयी त्यांना आवश्यक माहिती द्यावी. रोपाभोवती वाढलेले तण काळजीपूर्वक कसे काढायचे ते सांगावे.
- रोपाच्या वाढीच्या प्रक्रियेतील विविध अवस्थांवर चर्चा करा.
- थोड्याच दिवसात त्या बीजांना अंकुर फुटण्याचे मुलांना पहायला मिळेल आणि एका आठवड्याच्या आत त्यातून रोप उगवल्याचे पाहुन मुले उत्साहित होतील.
- ह्या उपक्रमाविषयी सर्व गटांचा दृष्टिकोन काय आहे, त्यानी ह्या उपक्रमाचा का व कसा आनंद घेतला, बीजापासून रोपाची निर्मिति, नियमितपणे ते रोपाची देखभाल, त्याचे पोषण व कुंडीतील अनावश्यक तण काढून त्याचा नाश ह्या सर्व प्रक्रियेतील त्यांचा सहभागा त्यांना काय वाटते हे जाणून घेणे.
अनुमान – ह्या सर्व चर्चा झाल्यानंतर गुरुंनी सृजन, पालन व आपल्यामधील नकारात्मक गुणांचा संहार करण्याचा अनुक्रमे ब्रह्मा, विष्णु व शिव ह्यांच्यासारखे कार्य करणाऱ्या गुरुंच्या भूमिकेविषयी चर्चा करावी. सृजन, पालन व संहार ह्यांची सम्पूर्ण प्रक्रिया आपल्या चांगल्यासाठीच आहे. गुरु छिन्नीने तासून आपले उत्तम चारित्र्य घडवण्याचे कार्य करतात.