दत्तात्रेय म्हणून स्वामी

Print Friendly, PDF & Email
स्वामी – त्रिमूर्ति अवतार

महाशिवरात्र गुरुवारी ७ मार्च १९७८ रोजी होती. या पवित्र दिवशी स्वामी कुठे असतील या विचारात भक्तगण असतानाच ४ मार्चला पहाटे काही भक्त आणि विद्यार्थी यांच्या छोट्या समूहाला घेऊन स्वामी उटीला गेले. ७ तारखेला त्यांनी उटी सोडले आणि म्हैसूरच्या वाटेवर असणाऱ्या मधुमलाईच्या जंगलाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. जंगलामध्ये एका छोट्याशा टेकडीवरील गेस्ट हाऊसमध्ये ते थांबले.

नाश्ता झाल्यावर गेस्ट हाऊस समोरच्या सुंदर हिरवळ वर बाबा थोडा वेळ चालले आणि त्यांनी ग्रुपमधील प्रत्येकाबरोबर फोटो काढ़ू दिला. एका विद्यार्थ्याने पोलेरॉईड कॅमेरा वापरून फोटो काढले. प्रत्येकाला लगेच फोटोच्या कॉपी देण्यात आल्या. सर्वात शेवटी बाबांनी त्या विद्यार्थ्याला त्यांचा फोटो काढण्यास सांगितले.

बाबांच्या भगव्या कफनीच्या खालचा भाग एका झुडुपाच्या छोट्याशा फांदीत अडकला होता, फोटो काढण्याआधी स्वामीचा अडकलेला रोब नीट करावा म्हणून मिसेस रतनलाल पटकन पुढे झाल्या आणि तेवढ्यात स्वामी जोरात ओरडले, “मला हात लावू नकोस.” आणि त्या पटकन मागे झाल्या. सर्वांना आश्चर्य वाटले. फोटो काढून झाल्यावर कॅमेरामधून बाहेर येणारा फोटो स्वामींनी घेतला आणि जोगारावांकडे दिला. त्यांनी तो हातात धरला आणि हळूहळू तो फोटो ‘डेव्हलप’ झाला. त्यांना काय दिसले?

बाबांच्या भगव्या कफनीमधील फोटो दिसेल असे त्यांना वाटले. परंतु, त्यांना तेथे कृष्ण-धवल फोटो दिसला. फोटोमध्ये जे रूप दिसले त्यात त्यांच्या अंगावर शुभ्र वस्त्रे होती, तीन शिरे आणि सहा हात असे ते रूप होते.

प्रत्येक हातामध्ये दैवी चिन्हे होती. खालचा डावा हात एका सुंदर गायीवर विसावला होता. मागच्या बाजूला चार कुत्री होती. मधला चेहरा बाबांचा होता!प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये वर्णन केलेले असे ते भगवान दत्तात्रेयांचे रूप होते –ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर या त्रिमुतांचे एकत्रित असे रूप. ते त्यांचे खरे रूप होते. सर्वांनी ती अविश्वसनीय निर्मिती डोळे भरून पाहिली, एक दुर्मिळ असा उलगडा सर्वांच्या हृदयात ठसला आणि त्यानंतर तो फोटो नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी वृंदावनमधील विद्याथ्यांशी बोलताना स्वामींनी सांगितले की ते त्यांचे खरे रूप आहे. स्वामींनी हेही स्पष्ट केले की जर मिसेस रतनलालनी त्यांना स्पर्श केला असता तर त्या जिवंत राहिल्या नसत्या.

[Source:http://www.saibaba.ws/articles2/jogarao.htm]