जंगलातून फेरफटका

Print Friendly, PDF & Email

जंगलातून फेरफटका

मुलांनो सुखासनात बसा. आरामात बसा. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर अगदी सैल सोडा, शिथिल होऊ द्या. तुम्हाला अगदी शांत आणि आनंदी वाटतंय. आता आपण जंगलातून एक फेरफटका मारून येऊ या.

चालायला जाताना घालतात तसे मऊ बूट आपण घालू या. या वृक्षराजीमधील ताज्या, शीतल हवेमध्ये आपण श्वास घेतोय. येथील वृक्ष इतके उंच आहेत जणू गगनाला स्पर्श करत आहेत…. मार्गात पाने पडलेली आहेत आणि त्यामुळे पायवाट मऊ झाली आहे. या उंच वृक्षांच्या पानांची सळसळ आणि पक्षांचा किलबिलाट ऐकू येतोय. ते जणू काही नवीन दिवसाचा महिमा गात आहेत. सकाळच्या सूर्याची किरणे झाडांच्या दाटीवाटीतून मार्ग शोधत जमिनीवर अशी पडली आहेत जसे प्रकाशाचे तुकडे विखरून टाकले आहेत आणि ते हिऱ्यांप्रमाणे चमकत आहेत. रंगीबेरंगी रानटी फुले किती सुंदर दिसत आहेत. पानांचा वास आणि फुलांचा सुगंध यांनी मन कसं ताजंतवानं झालंय. आसपास खारी, पक्षी, ससे दिसत आहेत नं? ते किती आनंदात आहेत. जंगलातल्या शांतीची मजा लुटत आहेत.

जंगलात अजून आतमध्ये वाहणाऱ्या झऱ्याचा खळखळ आवाज येतोय. शुद्ध, स्वच्छ आणि चमकणारं पाणी घेऊन झरा वाहतोय आणि प्राणी, पक्षी यांना आपले पाणी पिण्यासाठी बोलावताना जणु गाणं गातोय!

हा स्वर्गच आहे. आता दीर्घ श्वासोच्छवास करत राहा, आपण थोडा वेळ इथे अराम करू. आता परत जायची वेळ झाली आहे. या पक्षांना, प्राण्यांना आणि इतर काही नवीन मित्रांना भेटण्यासाठी आपण पुन्हा कधी तरी इथे नक्की येऊ. आता आपण आपल्या खोलीत परत आलोय. हळूहळू डोळे उघडा. जंगलातील शांतीचा अनुभव आणि ताजेतवानेपणा दिवसभर मनामध्ये राहू दे.

उपक्रम

जंगलात तुम्ही जे काही पहिले त्याचे चित्र काढा.

[उगम:- चित्रा नारायण आणि गायत्री रामचरण संबू यांच्या सायलेन्स टु साईलेन्स- (Silence to Sai-lens)- या मुले, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी असलेल्या हॅन्डबुकमधून-. श्री सत्यसाई शिक्षण संस्था:- मॉरिशस पब्लिकेशन]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *