जपानी भू-शास्त्रज्ञ
जपानी भू-शास्त्रज्ञ
बाबा म्हणतात, “सगळ्या नामारूपात असणारा मी सर्वसमावेशक आहे. कोणी साईबद्दल ऐकले नसेल किंवा कुणी दर्शनही घेतले नसेल तरी पण ते माझेच आहेत. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आणि कुठल्याही नावाने त्यांनी मला हाकारले तरी ती हाक माझ्यापर्यंत पोचेल हेच त्रिवार सत्य होय.”
एकदा भारतात आलेल्या जपानी भूगर्भशास्त्रज्ञाने बंगलोर मुक्कामी आपल्या मित्राच्या घरात स्वामीचे चित्र बघितले. ते वैज्ञानिक असल्याने जिज्ञासा वाटून बाबांबद्दल जाणून घेण्यासाठी आतुर झाले. तेव्हा त्यांचे मित्र व्हाईटफिलडमधील वृंदावन येथे त्यांना घेऊन गेले, कारण बाबांचे वास्तव्य त्यावेळी बंगलोरलाच होते.
जन्म झाला तेव्हा तुझ्या शरीराचा रंग निळा होता. डॉक्टरांनी सांगितले की बाळाने वाचणे कठीण आहे. मुलाच्या पित्याने त्यांना उचलले आणि भगवान बुद्धाच्या मंदिरात नेले. बुद्धांच्या चरणावर ठेवून प्रार्थना केली की तुमची दैवी शक्तीच याला तारेल किंवा मारेल. आणि नंतर मुलाला घेऊन घरी गेले. बाबांनी हे सर्व कथन केल्यावर सांगितले की बेटा, तेव्हापासून मी तुझा सांभाळ करतो आहे. हृदयाचा आकार बाबांनी साक्षात करून त्याला ते उघडून दाखविले तर अहो आश्चर्यम् त्याला तीनच कप्पे होते. शास्त्रज्ञ तर अवाकच झाला. त्यांच्या वडिलांनी सांगितले होते डॉक्टरनी तुझ्या हृदयाला तीनच कप्पे आहेत हे सांगितलय. परंतु ही गोष्ट दुसऱ्या कुणालाही माहीत नसताना बाबांना कशी कळली. अत्यंत गोपनीय अशी ही गोष्ट होती. स्वामींच्या देवत्वापुढे त्यांना शरण जावेच लागले.
देवत्व असेच असते, एखाद्या माळेसारखे. दोरा एक पण मोती अनेक. आणि त्या प्रत्येक मोत्यात काय दडलय ते धारण करणाऱ्या सूत्ररूपी परमेश्वरालाच माहीत.