The Legend behind नागपंचमी

Print Friendly, PDF & Email

The Legend behind नागपंचमी

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाचा ५ वा दिवस, या दिवशी नागांचा नागपंचमी हा सण साजरा केला जातो. हां सण वर्षा ऋतुमध्ये येतो आणि ह्या दरम्याने सर्पदंशाच्या वाढत्या संभावनेस प्रतिबंध करण्यासाठी हा सण साजरा केला जातो असे मानले जाते.

नागपंचमीशी निगडीत असंख्य दंतकथा आहेत. एका दंतकथेनुसार ह्या दिवशी एका शेतकऱ्याने जमिनीची मशागत करताना, चुकून काही नुकत्याच जन्मलेल्या सापांची हत्या केली. त्यांच्या मातेने त्या शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास दंश करुन त्याचा बदला घेतला. तथापि त्याचवेळी शेतकऱ्याची एक मुलगी नागाची प्रार्थना करत होती. त्या प्रार्थनेने, सर्पांच्या मातेचे हृदय द्रवले व तिने शेतकऱ्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या शरीरातून विष शोषून घेऊन बाहेर टाकले, तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. जे नागपंचमी साजरी करतात त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस सर्प दंश करीत नाहीत अशी समजूत आहे.

गरुड पुराणानुसार ह्या दिवशी नागांचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि पूजन करणाऱ्याच्या जीवनात मंगल घटना घडतात. ह्यादिवशी गरजूंना अन्नदानही केले जाते.

मानवांपेक्षा सर्पांमध्ये अधिक सामर्थ्य असल्याचे मानले जाते आणि त्याचे भगवान शिव, विष्णु आणि सुब्रमण्यम ह्यांच्याबरोबरच्या सान्निध्याने, मनातील भीतीपोटी सर्पाला देवत्व बहाल करण्यात आले आणि देशभरातील हिंदू त्यांची पूजा, भक्ती करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: