अमृत मंथनाची गोष्ट

Print Friendly, PDF & Email
अमृत मंथनाची गोष्ट

एकदा देव आणि असुरांनी नाना रत्नांच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंधन केले. मंधन करण्यासाठी त्यांनी मंदार पर्वताची रवी आणि सर्पराज वासुकीचा दोर केला. प्रथम कामधेनु आली, मग कल्पवृक्ष आला, समृद्धीची देवता लक्ष्मी आली आणि जालीम विष हलाहल पण आले. हे विष त्रिभुवनांचा नाश करील अशी भीती उत्पन्न झाली. लोकांनी स्वत:चे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली. कारूण्यसिंधु असलेल्या शिवाने त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन ते विष प्राशन केले. त्या विषाच्या ज्वालांनी भडकलेली आग सहन करणे शिवाला असह्य झाले. असे म्हणतात की त्यासाठी त्याच्या जटाधारी मस्तकावर गंगोदकाची संतत धार धरली होती. (सगळ्या शिवमंदिरांमध्ये व काही ठिकाणी सतत तासन् तास शिवावर केल्या जाणाऱ्या अभिषेकाचे मर्म हे आहे.)

देवांनी आणि असुरांनी क्षीरसमुद्रमंथन केले तेव्हा एकामागोमाग एक चौदा रत्ने समुद्रातून बाहेर येताना त्यांना दिसली. त्यामध्ये विषाने भरलेला एक प्याला बाहेर आला. ते विष इतके जालीम होते की एक थेंबाने सारे जग नष्ट होऊ शकले असते. आता समस्या उत्पन्न झाली की त्याचा निरास कसा करायचा. इतकी घातक गोष्ट ठेवायची कुठे? देव आणि असुर त्यांचा एकमेव पालनकर्ता असलेल्या श्रीविष्णूंकडे गेले. भगवान शंकर किती सामर्थ्यवान आहेत हे दाखविण्यासाठी भगवान विष्णूने त्यांना शंकराकडे पाठविले. हातामध्ये अत्यंत काळजीपूर्वक तो विषाचा पेला धरून ते कैलास पर्वतावर पोचले. प्रभु ध्यानमग्न अवस्थेत बसला होता.

त्या सर्वांनी त्याची प्रार्थना केली आणि आपल्या आगमनाचे प्रयोजन स्पष्ट केले. शिवाने स्मितहास्य केले व त्यांना धीर दिला. त्याने ते एका घोटात पिऊन टाकले. ते त्याच्या घशातून खाली उतरू लागले. पण शिवाला माहीत होते की जर ते त्याच्या रक्तात मिसळले तर त्याच्या पदस्पति सारे जग जळून खाक होईल. म्हणून त्याने ते घशातून खाली उतरू दिले नाही, ते त्याने कंठातच धारण केले. त्या विषाने त्याच्या गळ्याचा इतक दाह झाला की तो कमी करण्यासाठी त्याने सर्व शीतोपचार वापरून पाहिले. प्रथम त्याने चंद्र जवळ केला. पण चंद्र दाह कमी करू शकला नाही, मग त्याने जटेमध्ये गंगा धारण केली. तरी काही उपयोग झाला नाही. शेवटी भगवान शंकराने रामनामाचा जप करायला सुखात के आणि तो विषदाह तात्काळ शमला. प्रभूने माध्यावर चंद्र धारण केला आहे। त्याचे कारण हे असे आहे. तो कारूण्यसिंधु आहे कारण भक्तांची कार येऊन त्यांच्यासाठी त्याने विष प्राशन केले.

[Illustrations by Shyam, Sri Sathya Sai Balvikas Student]
[श्री सत्य साई बालविकास गुरु मार्गदर्शिका]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *