सत्यवादी चोर नाटकीकरण
सत्यवादी चोर नाटकीकरण
गोष्ट सांगाः चिन्नकथेतील निदान एखादा तरी दुर्गुण सोडून द्या (गोष्ट खाली दिली आहे) मुलांना यावर नाट्यीकरण करण्यास सांगा.
कथा – निदान एखादा तरी दुर्गुण सोडून द्या!
एक दुष्ट माणूस आध्यात्माची दीक्षा घेण्यासाठी एकदा गुरूकडे गेला. एखादा तरी दुर्गुण सोडून द्यावा असे गुरुंनी त्याला सांगितले. त्याने खोटे बोलणे सोडून दिले. त्या रात्री तो राजवाड्यात चोरी करण्यास गेला. तेव्हा त्याला गच्चीवर दूसरा माणूस दिसला. तोही चोरच होता. त्यांनी खजिना फोडला आणि तेथे सापडलेले हीरे आपसात वाटून घेतले. तो दूसरा माणूस म्हणजे राजाच होता.
राजाने चोर असल्याचा बहाणा केला होता. तो म्हणाला की खजिनाच्या किल्ल्या कुठे आहेत ते त्याला माहिती आहे. हिऱ्यांची वाटणी होत असताना त्या प्रामाणिक चोराला राजाची दया आली की राजाचा सर्व खजिना रिकामा होत आहे त्याने आपल्या सहकाऱ्यास सांगितले की खजिन्यात एक हीरा ठेवावा. त्याप्रमाणे त्यांनी केले. दुसऱ्या दिवशी लक्षात आले की खजिना फोडला गेला आहे. चोराचे सोंग घेतलेल्या राजाने नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी अमात्याला पाठवले. अमात्याला खजिन्यात एक हिरा सापडला. त्याने हळूच तो स्वतःच्या खिशात ठेवून दिला. आणि न्यायालयात सांगितले की सर्व हिरे चोरीला गेले आहेत.
आधीच्या रात्री राजाला त्या प्रामाणिक चोराचा पत्ता समजला होता. त्याला राजाने निरोप पाठवून बोलावले. न्यायालयात त्याने चोरी केल्याची कबूली दिली. पण तो एक हिरा चोरल्याचे त्याने व त्याच्या सहकार्याने कबूल केले नाही. तो हिरा अमात्याच्या खिशात सापडला. खोटे बोलल्याबद्दल राजाने अमात्यास काढून टाकले. आणि त्याच्या जागी त्या प्रामाणिक चोरास नेमले. त्याने चोरी आणि इतर वाईट सवयी सोडून दिल्या. तो एक गुणवान अमात्य झाल्याचा आनंद गुरुंनाही झाला.
तात्पर्य
चोराने खोटे बोलणे सोडून दिले म्हणजे तो असत्याकडून (असत) सत्याकडे गेला. म्हणजेच त्याचे जीवन अंधारातून प्रकाशाकडे गेले. त्यामुळे त्याने इतर दुर्गुणही टाकून दिले. आणि तो चांगला माणूस झाला. सद्गुणांबद्दल तो अनेक वर्षे आठवणीत राहिला. जेव्हा आपण सन्मार्गाने जातो तेव्हा लोक आपले स्मरण कायम ठेवत असल्याने आपण अमृत होतो.
हीच गोष्ट इतर सद्गुणांबद्दलही सांगता येईल. एखाद्या सद्गुणाचा सराव आपण निष्ठेने करू लागलो की इतर सद्गुणही आपल्याबरोबर येतात आणि आपण अमर होतो. महात्मा गांधी, अल्बर्ट आइनस्टाइन, अब्दुल कलाम ह्यांची उदाहरणे देता येतील. असत्य बोलणे सोडून देण्याबद्दल मुलांना सांगावे त्याचा सराव एक महिनाभर करण्यास सांगा. हा अभ्यास सोपा की अवघड, ते प्रत्येक तासाच्या वेळी विचारा. त्यामागील फायदे विचारा.