वाघाची गोष्ट

Print Friendly, PDF & Email
वाघाची गोष्ट

स्वामी सर्व प्राणिमात्रांवर सारखेच प्रेम करतात. पशुहत्या वा प्राण्यांची शिकार त्यांना अमान्य आहे. उरवकोंड्याहून बाबा पुट्टपर्तीला आल्यानंतर एक विचित्र गोष्ट घडली. एक मोठ्या प्राण्यांची शिकार करणारा इंग्लिश अधिकारी, चित्रावती नदीच्या पलीकडच्या बाजूस शिकार करण्यासाठी गेला होता. त्यांनी एका वाघिणीची शिकार केली व तो गाडी चालवत अनंतपूरला परत जात होता. अचानक पुट्टपर्ती गावाबाहेर त्याची जीप बंद पडली. वरकरणी पाहता काही कारणही दिसत नव्हते. जीपच्या ड्रायव्हरने व त्या अधिकाऱ्याने खूप प्रयत्न केले पण ती जीप सुरु झाली नाही.

आता असे झाले की त्या ड्रायव्हरने बाल साईंविषयी खूप गोष्टी ऐकल्या होत्या. त्याने बाबांविषयी त्या अधिकाऱ्यास सांगितले की तेथून जवळच असलेल्या गावामध्ये एक मुलगा राहतो. तो त्याच्या हाताचा पंजा वर्तुळाकार फिरवून विभूती सृजित करतो. त्या भस्माने सर्वांचे निवारण होते आणि कदाचित जीपच्या समस्येचेही निवारण होऊ शकेल. तो अर्ध्या रस्त्यात होता, इंजिनमध्ये काय बिघाड झाला आहे हे ही समजत नसल्यामुळे अधिकाऱ्याने गाडीत बसून प्रतीक्षा करायचे ठरवले व ड्रायव्हर बाबांना शोधण्यासाठी गावात गेला ड्रायव्हर काही वेळ बाबांना शोधण्यासाठी पुट्टपर्तीत इकडे तिकडे फिरला.

अखेरीस त्याने एका मुलाला पाहिले. त्यानी काही विचारण्या आगोदर बाबा म्हणाले, “मी त्या जीपकडे येतच होतो.” स्वामी त्या वालुकामय नदीपात्रातून चालत जीप उभी असलेल्या ठिकाणी आले. त्यांनी जीपमध्ये डोकावून पाहिले. त्यांना आतमध्ये एक देखणी वाघीण दिसली. त्या अधिकाऱ्याने दोन तास आधीच तिची शिकार केली होती. त्यानंतर बाबांनी त्यांना सांगितले की त्यांनीच पुट्टपर्तीच्या बाहेर जीप बंद पाडली कारण ती मृत झालेली वाघीण २ आठवडे वयाच्या तीन बछड्यांची माता होती. ते बछडे आता भूकेने विलाप करत आहेत व त्यांच्या मातेविना ते बेचैन ‘झाले आहेत. बाबांनी कड़क शब्दात त्यांना म्हटले,” जा परत जा आणि त्या तिन्ही बछड्यांना घेऊन या व त्यांना एखाद्द्या प्राणिसंग्राहलयामध्ये द्या जेथे त्यांची चांगली देखभाल केली जाईल. जंगली जनावरांची हत्या करु नका कारण त्यांनी तुम्हाला काहीही इजा पोहोचवली नाही. मग तुम्ही त्यांच्या शोधार्थ जाता, त्यांना पकडण्यासाठी तुम्ही त्यांना घेराव घालून सापळे का रचता?त्याऐवजी बाबांनी त्यां ना, प्राण्यांना कॅमेरा मध्ये टिपण्याचा सल्ला दिला. ते एक उत्तम साधन आहे. जे प्राण्यांना पंगु बनवत नाही वा त्यांची हत्या करत नाही. त्या अधिकाऱ्याने बाबांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन केले. तो त्या बछड्यांना घेऊन आला व एका प्राणीसंग्रहालयात त्यांची व्यवस्था केली. त्यानंतर तो प्राणयांना बंदूकी ऐवजी कॅमेंऱ्याने टीपू लागला. बंदूकीने टिपण्यापेक्षा कॅमेंऱ्याने टिपणे हा जीवन जगण्याचा अधिक आव्हानात्मक, शांतीपूर्ण, अहिंसक व उचित मार्ग असल्याचे त्याच्या लक्षात आले.

बाबांचा ज्ञानोपदेश त्या अधिकाऱ्याच्या हृदयाला एवढा स्पर्शून गेला की त्या वाघिणीच्या शरीरात पेंढा भरून आणल्यानंतर त्याला त्या वाघाच्या कातडयाकडे बघणेही असह्य झाले. तो जेव्हा पुट्टपर्तीमध्ये पुन्हा बाबांना भेटला तेव्हा ते कातडे त्याने बाबांच्या चरणी अर्पित केले.

[Source : Lessons from the Divine Life of Young Sai, Sri Sathya Sai Balvikas Group I, Sri Sathya Sai Education in Human Values Trust, Compiled by: Smt. Roshan Fanibunda]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: