पाषाणाला देव माना, देवाला पाषाण मानू नका
पाषाणाला देव माना, देवाला पाषाण मानू नका
त्यांनी म्हटले, “भंगलेली प्रतिमा विसर्जित करा, नवीन प्रतिमा बनवून तिची पूजा करा. रामकृष्ण म्हणाला, “तुम्ही असे करु शकत नाही. तुमच्या जवळच्या नातलगाचा जर पाय मोडला तर तुम्ही त्याला टाकून द्याल का?”
दक्षिणेश्वर येथे काली मंदिराच्या बाजूला राधा गोविंद मंदिर आणि शिवाची १२ मंदिरे आहेत. वेगवेगळ्या पुजाऱ्यांद्वारे दररोज सर्व देवदेवतांची पूजा केली जाते.
श्री रामकृष्णांनी कालीमातेच्या सेवेत स्वतःला समर्पित केल्यानंतर काही दिवसांनी एक अपघात घडला. तो नंदोत्सवाचा दिवस होता. कृष्ण जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा केला जातो. दुपारच्या पूजेनंतर राधा गोविंद मंदिराचे पुजारी गोविंदजींची मूर्ती बिछान्यावर ठेवण्यासाठी घेऊन जात असतांना ते घसरून पडले आणि मूर्तीचा पाय मोडला.
भंगलेल्या मूर्तीचे पूजन केले जात नाही, आता काय करायचे? मधुर बाबू आणि राणी रसमणीला ही बातमी कळवण्यात आली. त्यांनी पंडितांना बोलावून त्यांचे मत विचारले. भंगलेली मूर्ती गंगेत विसर्जित करुन, नवीन मूर्ती बनवून घेऊन तिचे पूजन करावे असे शास्त्र सांगते असे पंडितांनी सांगितले.
त्यानंतर रामकृष्णांचा सल्ला घेतला नाही असे मधुरबाबूंच्या मनात आले. रामकृष्णांना विचारल्यावर ते म्हणाले, “समजा. जर राणीच्या जावयांपैकी एखाद्याचा पाय मोडला तर त्याला सोडून देऊन नवीन जावई आणला जाईल का? वा त्याच्या पायावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले जाईल? ह्या मूर्तीच्या बाबतीतही तसेच केले पाहिजे. त्या मूर्तीचा पाय दुरुस्त करून, पूर्वीसारखीच त्या मूर्तीची पूजा केली पाहिजे.” सर्वांना त्याचा अर्थ समजला. खरच आपण आपला प्रिय आणि निकटवर्ती मानून त्याच्यावर आपले माता, पिता वा संततीसारखे प्रेम केले पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. तथापि ते देवाला केवळ एक मूर्ती मानत होते. श्री रामकृष्णांनी स्वतः अत्यंत कुशलतेने त्या मूर्तीचा भंगलेला पाय दुरुस्त केला.
प्रश्न-
- कृष्णाच्या भंगलेल्या मूर्तीबद्दल पंडिताचे मत काय होते?
- रामकृष्णांचा दृष्टिकोन काय होता?
- ह्या कथेचे तात्पर्य काय?
[स्त्रोत-stories for children part 2
प्रकाशक-sssbpt prashanti nilayam]