सत्य परमेश्वर आहे (I)
सत्य परमेश्वर आहे (I)
मोठ्या लोकांमध्ये असणाऱ्या अनेक सद्गुणांपैकी एक सद्गुण सत्यप्रीती हा आहे. अगदी त्याच्या बालपणापणापासून त्यांच्यात ही सत्यप्रीती असते. त्याचा हा ठाम विश्वास असतो की त्यांच्या बालपणातील या सत्याप्रीतीनेच नंतरच्या जीवनातही त्यांनी दुष्टाव्याशी सामना केलेला असतो, त्यासाठी धैर्य पुरविलेले असते. स्वामी विवेकानंदासारखे थोर संत जाणि लोकमान्य टिळकांसारखे थोर देशभक्त याच्या जीवनातून आपल्याला हाच अमूल्य संदेश मिळतो.
स्वामी विवेकानंद त्यांच्या शालेय जीवनात, लहानपणी नरेंद्र दत्त म्हणून ओळखले जात, त्यांच्यातील सत्यप्रियता आणि धैर्य हयामुळे ते अगदी लहानपणापासूनच त्यांच्या आई वडिलांना अभिमान वाटावा असे होते. अगदी लहानपणापासून ते कधीही खोटे बोलत नसत आणि चूक केली असेल तर ती कबूल करायला कधीही मागे-पुढे पाहात नसत.
एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी सर्व वर्गाची भूगोलाची तोंडी परिक्षा घेतली. प्रत्येक विद्यार्थी त्याची पाळी आली की शिक्षकांनी विचारलेले प्रश्नांची उत्तरे देत होता आणि आता नरेंद्राच्या शेजारील बाकावर बसलेल्या मुलाची पाळी आली. शिक्षाकांनी त्याला एक अवघड प्रश्न विचारला. विद्यार्थ्याने त्या प्रश्नाला थोडेसे घाबरत व घुटमळत उत्तर दिले. शिक्षक ओरडलेच, “काय हेच का तुझे भूगोलाचे ज्ञान? तू नक्कीच वर्गात मी जे शिकवतो त्याकडे लक्ष देत नाहीस आणि घरीही अभ्यास करीत नाहीस” हातातील छडी उगारीत ते रागाने म्हणाले, “हात पुढे कर.” मुलाने हात पुढे केला.
गुरुजींनी छडी त्या मुलाच्या हातावर मारण्यापूर्वीच, नरेद्र उठला अणि धीटपणाने बोलला, गुरुजी, कृपा करून त्याला मारु नका. तो पूर्णपणे बरोबर आहे. त्याचे उत्तर बरोबर आहे. “सगळा वर्ग थक्क झाला. शिक्षकांची रागीट नजर आता नरेंद्राकडे वळली आणि ते ओरडले, “काय तू मला भूगोल शिकवितोस? चल तुझा हात पुढे कर.” नरेंद्राने हात पुढे केला व शिक्षकांनी त्याला पुन्हा पुन्हा छड्या मारायला सुरुवात केली. तरीही नरेंद्र पुन्हा पुन्हा म्हणतच होता, “गुरूजी, त्याचे उत्तर बरोबर आहे. “आणि नंतर जेव्हा त्याने रडायला सुरुवात केली,त्या वेळीही त्याने कळवळून गुरुजींना सांगितले, “गुरुजी, कृपा करून भूगोलाचे पुस्तक पाहा मी सत्य तेच सांगितले आहे”.
त्याचा सत्य हा शब्द शिक्षकांच्या वर्मी झोंबला. नरेंद्राची चुक दाखवून देण्याच्या आवेशाने त्यांनी पुस्तक उघडले आणि ज्या पानावर त्यांनी आधीच्या मुलाला विचारलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर होते, ते पान काढून त्यांनी सावकाश वाचायला सुरूवात केली. सगळी मुले चिंताग्रस्त चेहऱ्याने गुरुजींकडे पाहत असतानाच, त्यांना पान वाचता वाचता गुरुजींचा चेहरा उतरत चाललेला दिसला.
नंतर त्या दोन विद्यार्थांपाशी येऊन शिक्षक म्हणाले “मला वाईट वाटते की माझाच त्या उत्तराबद्दल गोंधळ झाला आहे. हा नरेंद्र म्हणाला तेच बरोबर आहे.” नंतर नरेंद्राकडे वळून ते म्हणाले, “प्रिय मुला, मला तुझ्या धाडसाबद्दल आणि सत्यप्रियतेबद्दल कौतुक वाटते. तू एक आदर्श विद्यार्थी आहेस.” शिक्षकांचे हे शब्द ऐकून त्याच्या हातावर बसलेल्या छड्यांचे दुःख एकदम नाहीसे झाले, कारण नरेंद्राला समजले की या युध्दात केवळ सत्याचाच जय झाला.
नरेंद्राच्या या सत्यप्रेमामुळेच तो नंतर श्री रामकृष्ण परमहंसाकडे परमेश्वराबाबतचे सत्य आणि या विशवाबाबतचे सत्य शिकून घेण्यासाठी गेला. जेव्हा तो स्वामी विवेकानंद झाला तेव्हा त्याने संपूर्ण जगात सत्याचा प्रसार करण्यासाठी कठोर परिश्रम केले. लोकांनी ज्ञानसंपन्न करून, सुखी आयुष्य व्यतीत करावे हीच त्यामागे त्यांची भूमिका होती.
प्रश्न:
- आपल्या मित्राला छडीच्या मारापासून वाचविण्याचे धैर्य व बळ नरेंद्राला कशाने आले?
- नरेंद्राला मारण्यापासून शिक्षकांना परावृत्त करायला काय कारण घडले?
- खरे बोलल्याबद्दल तुम्हाला कधी इजा किंवा शिक्षा भोगावी लागली आहे का?
- खरे बोलल्याबद्दल आनंदित होण्याचा प्रसंग तुमच्यावर आला आहे काय? तुमच अनुभव सविस्तर सांगा.