त्वमेव माता श्लोक – उपक्रम
त्वमेव माता श्लोक – उपक्रम
उपक्रम पत्रक
माता पित्यांचे त्यांच्या मुलांप्रती असणारे व्हिडिओ बालविकासच्या मुलांना दाखवावेत.
पशूंचे त्यांच्या पिल्लांप्रती असणारे प्रेम दर्शविणारे व्हिडिओ, तसेच ज्यामध्ये मोठ्या प्राण्यांकडून भिन्न जातीच्या छोट्या प्राण्यांप्रती प्रेम आणि आस्था दर्शवली आहे उदा. हत्ती एका कुत्र्याची काळजी घेतोय, माकड एका अस्वलाच्या पिल्लाला सांभाळतोय इ. असे व्हिडिओही गुरु दाखवू शकतात.
चर्चेसाठी प्रश्नावली
- तुम्हाला व्हिडिओ आवडले का? तुम्हाला कोणता व्हिडिओ सर्वात जास्त आवडला? का?
- प्रेम केवळ आपल्याला घरातून मिळते असे तुम्हाला वाटते का? आपल्याला शाळेमध्ये कोण प्रेम देते? शाळेमध्ये आपली काळजी कोण घेते?
- तुम्हाला खेळायला आवडते का? आपल्यासाठी कोण खेळ रंजक बनवते?
- तुम्हाला मित्र/मैत्रिणी आहेत का? तुम्हाला त्यांच्याबरोबर राहणे आवडते का? का आवडते?
- तुम्हाला रस्ता ओलांडायची भीती वाटते का? तुम्ही कधी एकट्याने रस्ता ओलांडला आहे का? अशा परिस्थितीत, तुमच्या बाजूला असलेल्या व्यक्तीने रस्ता ओलांडण्यास तुम्हाला मदत केली होती का? तुम्ही कधी कोणाला रस्ता ओलांडण्यास मदत केली का?
- आपल्याला नेहमी आपले पालक, भाऊ वा मित्र/मैत्रीण ह्यांच्याबरोबर राहणे शक्य आहे का?
- तुम्ही कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीस प्रेम दर्शवले आहे का? कसे? त्यांना त्याबद्दल कसे वाटले? तुम्हाला त्यामुळे आनंद झाला का?
अनुमान
- मुलांना पालक, गुरु, मित्रमैत्रिण, नातेवाईक ह्यांच्याकडून मिळणारे प्रेम हे परमेश्वराचे प्रेम आहे.
- त्याचप्रमाणे आपणाकडून इतरांना दिलं/ दिले जाणारे प्रेमही परमेश्वराचेच प्रेम आहे.
- हे गुरुंनी मुलांना समजावून दिलं/ दिले पाहिजे. परमेश्वर आपल्या सर्वांवर सारखेच प्रेम करतो. आणि बिनशर्त प्रेम करतो कधीकधी मातेसारखा कधी मित्रासारखा तर कधी भावासारखा प्रेमवर्षाव करतो.
गुरुंनी एक दिवस वर्गामध्ये मुलांना स्वामींसाठी शुभेच्छा पत्र बनवण्यास सांगावे.
टिपण
यूट्यूब वर व्हिडिओ उपलब्ध आहेत. बालविकास गुरुंना विनंती करण्यात येते की त्यांनी यूट्यूबवरील व्हिडिओ वर्गात दाखवण्याच्या आगोदरच शोधून, पाहून ठेवावेत, ज्यामुळे वर्गात व्हिडिओ लावते वेळी गोंधळ, गडबड व विलंब टाळला जाईल.