विचार, उच्चार आणि आचारात एकत्व

Print Friendly, PDF & Email
विचार, उच्चार आणि आचारात एकत्व

विचार उच्चार आणि आचारातील सत्यतेचे महत्त्व जाणणे.

(दोन पॅरेग्राफ आणि बिंदूंमध्ये विराम)

त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.

पाऊल १: “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा.
एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”

पाऊल २: आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा, उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल.

पाऊल ३: कल्पना करा की उन्हाळ्यातल्या एका अल्हाददायक दिवशी तुम्ही एका बागे मध्ये आहात…

सूर्यकिरणांच्या तेजाने तुम्हाला अत्यंत आनंद वाटत आहे…

हवे मधून एक चेंडू येतो आणि तो तुमचा जवळ असलेल्या एका झुडपाखाली जातो. तो चेंडू, तुमचा मागील आठवड्यात हरवलेल्या चेंडू सारखाच आहे.

त्यानंतर एक मुलगी धावत येते आणि तुम्हाला विचारते, तुम्ही इथे कुठे एक चेंडू पाहिला का… तो चेंडू तुम्ही स्वतःसाठी ठेवाल का सत्य सांगाल…

तुम्ही त्या झुडपाकडे बोट दाखवता…

तुम्ही दोघेही त्या झुडपाकडे धाव घेता आणि तुम्हाला तो चेंडू सापडतो तुम्ही तो तिला देता… तिला आनंद होतो… सत्य सांगितल्यामुळे तुम्हालाही आनंद होतो.

पाऊल ४: आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या.
हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.

‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *