मूल्य ओळखा
मूल्य ओळखा
उद्दिष्ट:
मुलांनी शारीरिक संवेदना चे मानसिक चित्रामध्ये रूपांतर करावे आणि मनामध्ये त्या मानसिक चित्राची छोटी मालिका डोक्यात ठेवून योग्य शब्द ओळखला पाहिजे.
संबधित मूल्ये:
- एकाग्रता
- जागरुकता
- स्मरणशक्ती
- मूल्यांची जाणीव
खेळ कसा खेळावा?
- गुरूंनी वर्गातील मुलांच्या जोड्या बनवाव्यात.
- जोड्यांनी खेळ कसा खेळावा हे गुरूंनी मुलांना समजावून सांगावे.
- जोडीमधील एका मुलाने दुसऱ्याच्या पाठीवर बोटाने मूल्याचे नाव उच्चारण ना करता लिहावे.
- जोडीतील सहकाऱ्याने त्याच्या पाठीवर लिहीत असताना पूर्ण लक्ष केंद्रित करून मूल्याचे नाव ओळखण्याचा प्रयत्न करावा.
- जर पहिल्या वेळेस त्याला नाव ओळखता आले नाही तर त्याला अजून दोन संधी दिल्या पाहिजेत.
- ज्याने जितक्या संधी घेतल्या त्यानुसार ५ वा ३ वा १ असे गुण द्यावे.
- जोड्यांमधल्या भूमिकांची अदलाबदल करावी, लिहणारा होता त्याने मूल्य ओळखावे.
- हा उपक्रम अधिक रंजक होण्यासाठी २ फेऱ्यानंतर मुलांना त्याचा जोडीदार बदलण्याची मुभा द्यावी.
गुरूंना सूचना:
- खेळातील बदल -गट २ साठी
- स्वामींची दोन तीन शब्दामधली सुवचने देवू शकता.( अन्नम् ब्रह्म, सर्वावर प्रेम करा) जर आवश्यक असेल तर गुरूंनी लिहणाऱ्या मुलास मूल्यांची नावे (शब्द) सुचवावे.