बिभीषण रामाला शरण जातो
बिभीषण रामाला शरण जातो
रावणाने त्याच्या सर्व मंत्र्यांना दरबारात बोलावले. सर्व मंत्र्यांनी भीतीयुक्त अंतःकरणाने रावणास पाठिंबा दिला. फक्त बिभीषण रावणास म्हणाला, “राम हा काही सामान्य मानव नाही. तुझ्यासारखा एकटा जीव त्या चौदा भुवनांच्या अधिपतीस इजा”
पोहचवण्यासाठी वा अडवण्यासाठी काय करु शकतो? त्या दिव्य पुरुषाविषयी मनात असलेल्या द्वेषभावाचा त्याग कर. त्याची पत्नी त्याला परत दे व त्याची कृपा प्राप्त कर.”रावणाने संतापून ,त्याच्या शत्रूचे स्तुतीगान करणाऱ्यास दरबारातून बाहेर काढण्याची आज्ञा दिली.”
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, त्यांच्या मनावर अंतर्भूत मूल्ये बिंबवावीत.
आपल्या आजूबाजूस कितीही बलिष्ठ वा घमेंडखोर लोकं असले तरी आपण कधीही सत्य बोलण्यास व सदाचरणाचे अनुसरण करण्यास घाबरु नये.
अंतर्भूत मूल्ये- सत्यं वद, धर्मं चर
झिरो नाही, हिरो बना (जो सत्याच्या बाजूने उभा राहतो व ते कथन करण्यास घाबरत नाही तोच खरा हिरो होय.)
बिभीषणाने रामाचे नाम घेऊन महेंद्र पर्वतावर पोहोचण्यासाठी समुद्र पार केला व रामाला भेटण्याची अनुमती घेतली. वानरांनी त्याला येताना पाहिले तेव्हा त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली. व ते त्याला बंदी बनवून घेऊन जाणार होते. परंतु दयाघन राम म्हणाला की जरी एखादी वाईट व्यक्ती शरण आली तरी त्या व्यक्तिस दयाभावाने वागवावे. बिभीषणास रामासमोर आणल्यानंतर त्याने रामाच्या चरणांवर लोळण घेतली. तो म्हणाला की त्याने राक्षसकुलात जन्म घेतला असला तरी रामाने त्याचे रक्षण करावे. असे म्हणून तो शरणागत झाला. राम त्याला म्हणाला, “तुझ्याकडे सर्व आवश्यक सद्गुण आहेत अन्यथा तुला माझे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण करण्याची ही संधी प्राप्त झाली नसती.”
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून, त्यांच्या मनावर अंतर्भूत मूल्ये बिंबवावीत. परमेश्वर दयाळु आहे. जर आपल्याला आपण केलेल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला व ती चूक पुन्हा न करण्याचे आपण वचन दिले तर तो नेहमी आपल्याला क्षमा करतो, आपला प्रेमाने स्वीकार करतो. आपणही आपल्या मित्रांबरोबर प्रेमाने वागले पाहिजे व त्यांच्याबरोबर क्षमाशील असायला हवे.
अंतर्भूत मूल्ये- प्रेम म्हणजे देणे आणि क्षमा करणे. स्वार्थ म्हणजे घेणे आणि विसरणे. गुरुंनी मुलांना स्वामींच्या दर्शन, स्पर्शन आणि संभाषण ह्या विषयीच्या प्रसंगातून ते स्पष्ट करून सांगावे आणि त्यातून भक्तांना कसा दिव्य आनंदाचा लाभ होता हे सांगावे.
रामाने बिभीषणाच्या मस्तकावर जल सिंचित केले आणि त्याला भविष्यातील लंकेचा अधिपती बनवण्याचे वचन दिले. रामाने सर्वांना सांगितले की बिभीषणास आपला मित्र, साथीदार समजा. त्यानंतर सर्वजण समुद्रकिनाऱ्याकडे गेले.