चांगली कानगोष्ट

Print Friendly, PDF & Email
चांगली कानगोष्ट
उद्दिष्ट:

हा एक असा मनोरंजक खेळ आहे, की ज्यामध्ये लक्षपूर्वक ऐकण्याची आणि परिणामकारक संवाद करण्याची कला मुलांच्या मनावर ठसते.

संबंधित मूल्ये:

सकारात्मक आणि प्रेरणादायी वाक्यातून मुलांची आकलनशक्ती, समज वाढवण्यासाठी हा खेळ साहाय्यभूत होतो.

आवश्यक साहित्य:

मूल्ये लिहिलेली पुठ्याची छोटी कार्ड्स.

गुरुंसाठी आवश्यक पूर्वतयारी:
  1. वचनांची यादी – सकारात्मक, मूल्याधिष्ठित आणि विनोदी मजेशीर वाक्ये
  2. वाक्ये लहान, सुटसुटीत असावीत. एका वाक्यात ४ पेक्षा जास्त शब्द नसावे. (उदा. सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, नेहमी मदत करा, कधीही दुखवू नका, तुमच्या पालकांवर प्रेम करा)
  3. मानवी मूल्यांच्या कार्डांचा संच.
खेळ कसा खेळायचा
  1. गुरुने मुलांना वर्तुळात खाली बसायला सांगावे. एक मूल गुरुंजवळ जाईल आणि गुरु त्याच्या कानात एक वाक्य कुजबुजेल.
  2. ते मूल आपल्या जागेवर जाईल आणि त्याच्या शेजारच्या पुढच्या मुलाच्या कानांत हळूच एक वाक्य सांगेल. याप्रमाणे त्यांनी ऐकलेले वाक्य मुले क्रमाने त्यांच्या शेजारी बसलेल्या मुलांच्या कानांत सांगतील.
  3. कोणालाही हे वाक्य मोठ्याने सांगण्याची परवानगी नाही.
  4. फक्त गोलात बसलेल्या शेवटच्या मुलाने ते मूळ वाक्य मोठ्याने सांगायचे आहे. यानंतर ज्या मुलाने खेळाला सुरुवात केली, तो ते मूळ वाक्य मोठ्याने सांगेल.
  5. जर शेवटच्या मुलाने वाक्य बरोबर सांगितले, (निदान साधारण अर्थ) तर तो गट मानवी मूल्याचे १ कार्ड जिंकेल.
  6. यानंतर वेगवेगळी वाक्ये घेऊन खेळ पुढे चालू राहील आणि प्रत्येक वेळी वेगळा मुलगा खेळाची सुरुवात करेल.
  7. यानंतर गुरूने मुलांबरोबर चर्चा करून या वाक्याचा अर्थ आणि त्याच बरोबर प्रभावी परस्परसंवादाचे महत्त्व त्यांना सांगावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: