तरुण परिक्षक
तरुण परिक्षक
उद्दिष्ट:
परस्परसंवादी व ज्ञान देणारा खेळ
संबंधित मूल्ये:
विवेकबुद्धी (योग्य/अयोग्य भेद करण्याची क्षमता)
आवश्यक साहित्य:
काही नाही
गुरुंसाठी पूर्वतयारी:
काही नाही
खेळ कसा खेळायचा:
- गुरूने मुलांना वर्तुळ करून बसायला सांगावे.
- एक मुलगा मध्यभागी उभा राहील आणि जणूकाही एखादी चुकीची कृती करत आहे, असा अभिनय करेल. (उदा. रस्त्यावर थुंकणे किंवा भिंतीवर काहीतरी लिहिणे.)
- आवश्यकतेनुसार ते मूल काही शब्दप्रयोग करू शकते.
- इतर मुलांना एक मिनिटाचा कालावधी मिळेल, त्या वेळांत त्यांनी – ‘तो मुलगा जे करत आहे, ते त्याने कां करू नये.’ ते एखादे चांगले कारण सांगून स्पष्ट करावे.
नियम/बक्षीस:
जो मुलगा /मुलगी सर्वोत्तम कारण सांगेल, तो आतां मधोमध उभा राहील. वर्तुळात बसलेल्या मुलांना त्याच्या कृतीसाठी योग्य स्पष्टीकरण/कारण सांगता आले नाही, तर मध्यभागी उभा असलेल्या मुलाला आणखी एक संधी मिळेल. यावेळी गुरु परीक्षकाचे काम करतील.