जाणीव
जाणीव
श्रवण कौशल्य विकसित करणे
गुरुंनी कौशल्य विकसित करण्याची सराव पुस्तिका हळूहळू वाचावी, जेथे टिंब टिंब आहेत तेथे थोडा विराम घ्यावा ….
जर गुरुंची इच्छा असेल तर त्यांनी त्या पार्श्वभूमीवर एखादे अल्हाददायक संगीत लावावे.
त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी
१) “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”
२) आता पंचेंद्रियांची जाणीव ठेवा.
खोलीतील हवेचा गंध
तुमच्या मुखातील पाण्याची चव
तुमच्या पायाखालील जमिनीचा कठीणपणा
त्वचेला होणारा हवेचा स्पर्श
एक दोन मिनिटे स्तब्ध राहून खोलीमधील आवाज ऐका.
खोली बाहेरील आवाजाचा मागोवा घ्या….. शक्य असेल तेवढा तुमच्या श्रवणशक्तीस ताण द्या.
एक दोन मिनिटे स्तब्ध राहून
३) आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या.
हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.
‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)