पूर्ण स्मृती
पूर्ण स्मृती
उद्दिष्ट:
मुलांनी पूर्ण लक्ष केंद्रित करणे, विचार करणे,आठवणे. ह्या सर्व गोष्टी ह्या खेळासाठी आवश्यक आहेत. त्यांच्या मेंदूला ताण देण्यासाठी सहाय्य करणारा हा आदर्श खेळ आहे.
संबंधित मूल्ये:
- एकाग्रता
- निरीक्षण
- स्मरणशक्ती
साहित्य:
- १ ट्रे
- १० वस्तू
- १ मोठा टॉवेल
- एक पेन आणि कागद
तयारी:
गुरुंनी रोजच्या व्यवहारातील १० उपयुक्त वस्तू गोळा कराव्यात ( उदा. खोडरबर, किल्ली, काडेपेटी, घंटा इत्यादी.) आणि त्या ट्रेमध्ये मांडून ठेवाव्यात.
खेळ कसा खेळायचा?
- हा खेळ जोड्या जमवून खेळायचा आहे. गुरुंनी प्रत्येक जोडीला एक कागद आणि पेन द्यावे.
- गुरुंनी वर्गातील मुलांना ट्रेमध्ये मांडलेल्या वस्तू एक ते दोन मिनियासाठी दाखवाव्या आणि मुलांना त्या वस्तूंचे जवळून निरीक्षण करण्यास सांगावे.
- त्यानंतर गुरूंनी तो ट्रे टॉवेलनी झाकून ठेवावा.
- गुरूंनी मुलांना जेवढ्या वस्तू आठवत आहे त्या कागदावर लिहिण्यास सांगाव्यात.
- जी जोडी जास्तीत जास्त वस्तूंची नावे लिहील त्यांना सर्वात जास्त गुण मिळतील.
भिन्न प्रकार:
गुरु त्यातील कोणत्याही दोन वस्तू काढून ठेवू शकतात/ वस्तूच्या जागेची अदलाबदल करू शकतात/गुरु एखाद्या विशिष्ट अक्षरांनी सुरू होणाऱ्या वस्तूंची नावे विचारू शकतात. उदा. प वा इतर.
गुरूंसाठी सूचना:
- या प्रत्येक वस्तूतील उपयुक्तता काय आहे.(काडेपेटी: प्रकाश, फुले: सुगंध) याविषयी गुरु वर्गामध्ये चर्चाही करू शकतात, ज्यामुळे मुलांमध्ये प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्याची दृष्टी विकसित होऊ शकते.
- जेव्हा जेव्हा मुलांना आठवत नाही ते अडकतात तेव्हा त्यांना गुरु गायत्री मंत्र उच्चारण्यास सांगू शकतात कारण गायत्री मंत्रामध्ये स्मरणशक्ती तल्लख बनविण्याचे सामर्थ्य आहे त्याच्या उच्चारणाने अधिकाधिक वस्तूंचे स्मरण होईल आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांना गायत्री मंत्राचे सामर्थ्य लक्षात येईल.