स्तब्धतेतील थरार

Print Friendly, PDF & Email
स्तब्धतेतील थरार
उद्देश्य:

परस्परांमध्ये संवाद घडवून आणणारा हा उपक्रम आहे ज्यामुळे मुलांमध्ये जागरूकता आणि एकाग्रता या गुणांचे संवर्धन होते. मन स्तब्ध ठेवायचे असेल तर प्रथम शरीर स्तब्ध ठेवणे महत्वाचे आहे.

संबंधित मूल्ये:
  • नवीन गोष्टींची सुरुवात
  • स्वतःवर संयम
  • शांतता
  • स्थिरता
साहित्य:

संगीत

खेळ कसा खेळावा?
  1. गुरूंनी संगीत सुरु करावे आणि मुलांना गोल करून पळण्यास सांगावे
  2. संगीत थांबल्यावर गुरूंनी जोरात ‘कृष्ण’ असे म्हणावे. त्याच क्षणी सर्व मुलांनी कृष्णाप्रमाणे ‘पोझ’ घेऊन पुतळ्यासारखे स्तब्ध उभे राहावे.
  3. जे कोणी आपले शरीर थोडे सुद्धा हलवेल त्याला खेळातून बाद करावे.
  4. इतर उदाहरणे- हनुमान, राम, शिव, विठ्ठल, नरसिंह, जिझस, बुद्ध, मीराबाई. अशीही काही नावे गुरु सांगू शकतील.