ॐ सर्व मंगल श्लोक- उपक्रम
ॐ सर्व मंगल श्लोक- उपक्रम
- गुरुंनी सम्पूर्ण अर्थासह श्लोक स्पष्ट करून सांगावा.
- श्लोकाच्या अर्थामधील काही महत्त्वाचे शब्द अथवा शब्द समुदाय गुरुंनी फळ्यावर लिहावेत. उदा. शुभ, सर्व प्रकारची सम्पत्ती, शंकराची पत्नी, श्री विष्णुची भगिनी, यश देणारी, इत्यादि.
- यानंतर एखाद्या मुलीस पार्वतीची भूमिका साकारण्यास सांगावे (गुरु एखाद्या मुलीस निवडून तिला पार्वतीची वेशभूषा करण्यास सांगू शकतो) अथवा देवी पार्वतीचे चित्र वर्गामध्ये ठेवावे.
- बाकीच्या मुलांना वर्गात जेवढी मुले असतील त्यानुसार एकेकट्यांना किंवा २ ते ३ मुलांच्या गटाना बसवून त्यांना स्वतःची प्रार्थना लिहिण्यास सांगावी व त्यामध्ये फळ्यावरील काही अथवा सर्व महत्त्वाच्या शब्दांचा समावेश करण्यास सांगावा उदा. हे माते तू शंकराची पत्नी आहेस, श्री विष्णुची भगिनी अहेस, कृपया मला सर्व यश प्रदान कर. दूसरे उदाहरण म्हणजे- “हे सर्व मंगले मी तुला शरण आलो आहे, कृपया मला सर्व प्रकारची सम्पत्ती प्रदान कर.”
- यानंतर मुलांना आपापल्या प्रार्थना पाठ करण्यास सांगून या प्रार्थना त्यांना हावभावासह, भक्तिभावनाने देवी पार्वतीला फूल अर्पण करत एकेकटयाने किंवा गटागटाने येऊन म्हणण्यास सांगावे.
या उपक्रमा संबंधी
हा एक अतिशय सुरेख उपक्रम आहे. ज्यामुळे मुलांना श्लोकाचा अर्थ समजण्यास व श्लोक लक्षात ठेवण्यास मदत होते. देवीच्या प्रती भक्तीचे संवर्धन होण्यासाठी आणि देवी किंवा हा श्लोक जी मूल्ये दर्शवितो ती मुल्ये समजून घेण्यासाठी हा एक हल्का– फुल्का उपक्रम आहे ज्यामधून मुलांना मजादेखील येईल. या उपक्रमानांतर गुरु मुलांना वर्गामध्ये अर्थासह ही प्रार्थना म्हणण्यास सांगू शकतात.