कुटुंब
कुटुंब
श्री सत्य साई बाबांनी जे राजू कुटुंब जन्म घेण्यासाठी निवडले ते सुप्रसिध्द ऋषि वेंकवधूतांच्या काळापासून त्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल ओळखले जाई. त्यांचे आजोबा रत्नाकरम कोंडम्मा राजू ११६ वर्षापर्यंत जीवन जगले. ते एक सौम्य आणि शांत व्यक्ती होते. चे संगीतावर प्रभुत्व होते. ते अभिनय करू शकत होते तसेच स्वतः नाट्यलेखनही करत असत. लेपाक्षी मधील एका कवीने गीतांमध्ये शब्दबध्द केलेले संपूर्ण रामायण त्यांना मुखोद्गत होते.
येथे त्या महाकाव्यातील नाट्यमय प्रसंग गीतांमधून प्रस्तुत करण्यात आले आहेत. भिनयकुशल श्री कोंडम्मा राजुंनी रामभक्त बंधु लक्ष्मणाची भूमिका केली होती. त्यांनी दाखवलेली लक्ष्मणची अढळ भक्ती सर्व श्रोत्यांच्या हृदयास स्पर्शून गेली. ह्या विशेष भूमिकेसाठी त्यांना नेहमीच मागणी असे व त्यासाठी त्यांना विचारणा केली जात असे.
राजू कुटुंबाने, गोपालस्वामीचे मंदिर बांधून आणि भक्ति परायण आणि आदरणीय आजोबांनी भगवान श्रीकृष्णाची अर्धांगनी सत्यभामेचे मंदिर बांधून गावास बहाल केले.
श्री कोंडम्मा राजु ह्यांना दोन पुत्र होते. एक पेद्दा वेंकप्पा राजु व दुसरा चिन्ना वेंकप्पा राजु. दोघांनाही त्यांच्या पित्याचा संगीत, वाङमय व नाट्यशास्त्र कौशल्ये ह्यांचा वारसा लाभला होता.
ज्येष्ठ पुत्र ज्यांना नंतर त्यांच्या विधीलिखितानुसार साई बाबांचा ‘पिता’ होण्याचे भाग्य लाभणार होते, त्यांचा दूरच्या नात्यातील सुब्बा राजू ह्यांच्या कन्या ईश्वराम्मा ह्यांच्याशी विवाह झाला.
दिव्यत्वाच्या प्रेरणेने झालेल्या ह्या परिण्यातून त्या दांपत्यास शेषमा राजु हा एक पुत्र व वेंकम्मा आणि पर्वतम्मा अशी दोन कन्यारत्ने लाभली. कोंडम्मा राजूंच्या पत्नी लक्ष्मम्मा ह्यांची जीवनात परमेश्वराचे आशिर्वाद प्राप्त करण्याची एकमात्र इच्छा होती. जो अत्यंत भक्तिभावने उपवास, व्रतवैकल्पे व जागरण करून, परमेश्वरास भजतो त्याला परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतात असे धर्मग्रंथांमध्ये घोषित केले आहे. लक्ष्मम्मांनी अत्यंत भक्तिभावाने त्याचे तंतोतंत पालन केले.
कोंडम्मा राजु वृध्दत्वाकडे झुकल्यानंतर, अभिनय व नाट्यलेखनातून रजा घेतली व ते गावातील मुलांना आपल्या भोवती गोळा करून त्यांना परमेश्वराच्या व अवतारांच्या कथा सांगण्यात आनंद घेऊ लागले. ते त्यातील प्रत्येक पात्राचे व प्रसंगाचे हूबेहुब वर्णन करून जिवंत चित्रण उभे करत त्यामुळे मुलांनाही त्यांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडत. अशा ह्या साध्या सुध्या, धर्मनिष्ठ कुटुंबामध्ये साईबाबांनी जन्म घेतला.
कोंडम्मा राजु शुध्द शाकाहारी होते. त्यांना त्यांच्या लहानग्या सत्याविषयी विशेष प्रेम होते. जेव्हा मांसाहार शिजत असे तेव्हा सत्या त्याच्या बाजूलाही कधी थांबत नसे. सत्या सात वर्षाचा होता ,तेव्हापासूनच ह्या बुध्दिमान व हिकमती बालकास स्वादिष्ट सांबार ,भात,चटणी असे पदार्थ बनवता येत होते आणि त्याच्या आईला , बहिणींच्या मदतीने बनवण्यासाठी जेवढा वेळ लागे, त्यापेक्षाही कमी वेळात तो बनवत असे.
हे छोटे बालक त्याच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध करत असे. अभिनयही करत असे. शिवाय नाट्यलेखनही करत असे. त्यामुळे आजोबा आनंदीत होत असत. नंतरच्या काही वर्षात भक्त त्यांच्या नातवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तेथे येत व कोंडम्मा राजूुंची भेट घेत असत तेव्हा परमेश्वराने त्याच्या कुटुंबात जन्म घेतल्याचा आनंद कोंडम्मा राजूुंच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत असे. त्यांना त्यांच्या गुरुंनी उच्चारलेल्या शब्दांचे स्मरण होत असे. त्यांचे गुरु श्री वेंकावधूत म्हणाले होते, “भूदेवी अश्रु ढाळते आहे. नारायण येतील. तू त्यांना पाहु शकशील. ते तुझ्यावर प्रेम करतील.” आणि तसेच घडले. नारायण त्यांच्या घरी सत्य साईंच्या रुपात आले. व त्यांचे अखेरचे दिवस वर्णनातीत आनंदाने व हर्षोल्हासाने भरून टाकले.
१९५० साली, परमेश्वाराच्या सेवेतील ह्या परीपूर्ण जीवनाची अखेर झाली. रामायणातील श्लोक मोठया आवाजात गात असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.
[Source: Lessons from the Divine Life of Young Sai, Sri Sathya Sai Balvikas Group I, Sri Sathya Sai Education in Human Values Trust, Compiled by: Smt. Roshan Fanibunda]