माया पात्र

Print Friendly, PDF & Email
माया पात्र
उद्दिष्ट:

मुलांचे कुतूहल वाढवणारा आणि त्यांना कामाचे प्राधान्य आणि वेळेचे व्यवस्थापन या संबंधित माहिती आणि ज्ञान देणारा हा एक रचनात्मक खेळ आहे.

संबंधित मूल्ये:
  • जिज्ञासा
  • विवेक बुद्धी
  • निर्णय क्षमता
  • सहकार्य
साहित्य:
  1. दोन सारख्या आकाराची भांडी
  2. गोट्या
  3. खडी
  4. वाळू /कोरडी माती
  5. वेगवेगळ्या कपामध्ये सारख्या प्रमाणात पाणी
खेळ कसा खेळावा
  1. गुरुंनी वर्गातील मुलांचे दोन गट बनवावेत.
  2. प्रत्येक गटाला दोन भांड्यांपैकी एक भांडे (माया पात्र) आणि त्याबरोबर गोटया, खडी,वाळू किंवा कोरडी माती सुद्धा देण्यात यावी.
  3. ह्या खेळामध्ये, त्यांना दिलेल्या भांड्यामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे कमीत कमी वेळात बसवण्याचे आव्हान आहे.
  4. ज्या गटाकडून हे कार्य प्रथम पूर्ण केले जाईल त्यांना जास्तीत जास्त गुण मिळतील.
गुरूंसाठी सूचना:
  • प्रत्येक गटांनी ते भांडे पूर्ण भरल्यानंतर, त्यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयी त्यांच्याशी चर्चा करावी.
  • त्या चारही वस्तू भांड्यामध्ये घालताना त्यांनी त्या वस्तूंचा क्रम कसा निश्चित केला?
  • तो क्रम निश्चित करताना त्यामागे काही विशेष कारण होते का?
  • वा त्यांनी प्रत्येक गोष्ट विचार न करता केली?
  • तसे असेल तर त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले?
  • मुलांच्या असे लक्षात येते की जे गट यामध्ये यशस्वी झाले त्यांनी अर्थातच पुढील योग्य क्रमाने प्रथम गोट्या टाकल्या त्यानंतर खडी टाकली त्यानंतर वाळू टाकली आणि शेवटी पाणी टाकले.
  • त्यानंतर गुरूंनी, या खेळाचा आधार घेऊन मुलांना त्यांच्या दैनंदिन कार्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि त्याचे नियोजन करणे कसे गरजेचे आहे हे शिकवावे.
  • या उपक्रमातून असे दर्शविले जाते की प्रथम महत्त्वाची कामे करावीत त्यानंतर आवश्यक परंतु कमी महत्त्वाची कामे करावीत आणि अखेरीस जी फारशी महत्त्वाची नाही अशी कामे करावीत.
  • ताण तणाव टाळण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी हे लागू आहे.
  • आपले भगवान बाबा जे आपल्याला नेहमी सांगतात ‘वेळेचा अपव्यय म्हणजे जीवनाचा अपव्यय’ यासाठी प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन हा एक धडा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: