त्रिगुण

Print Friendly, PDF & Email
त्रिगुण
उद्दिष्ट:

मुलांना खेळताना, मौज वाटेल असा हा खेळ आहे. हा खेळ खेळताना मुलांनी सत्व, रजो, आणि तमोगुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन गोष्टींचे मिश्रण वेगवेगळे करून सात्विक गुणांचा सराव करायचा आहे.

संबंधित मूल्ये:
  • एकाग्रता
  • विवेक बुद्धी
  • सांघिक-बांधिलकी
साहित्य:

तीन वेगवेगळी कडधान्ये

  • काबुली चना- सात्विक
  • काळा चना- तामसिक
  • राजमा- रजो
  • कडधान्य ठेवण्यासाठी छोट्या ताटल्या किंवा वाट्या
खेळ कसा खेळावा
  1. गुरुंनी वर्गातील मुलांचे छोटे गट बनवावेत.
  2. प्रत्येक गटाला तिन्ही कडधान्याचे मिश्रण द्यावे.
  3. प्रत्येक गटातील सर्व मुलांनी एकत्र येऊन, त्रिगुणांचे प्रतिनिधित्व करणारी तीन कडधान्ये लवकरात लवकर वेगवेगळी करावीत.
  4. जो गट हे काम प्रथम करेल तो विजयी होईल.
गुरूंसाठी सूचना:
  • खालील गोष्टींवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी हा खेळ खेळून झाल्यानंतर वर्गातील मुलांबरोबर केलेली चर्चा खूप प्रभावी ठरेल-
  • तीन गुणांची उदाहरणे रावण- रजो गुण, बिभीषण- सात्विक गुण, कुंभकर्ण- तमो गुण
  • सत्य भक्ती इ. सारखे सात्विकतेचे विशेष गुण मुलांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक गटाने दिलेले काम त्यांच्यामध्ये कसे विभागले आणि त्याचा कसा फायदा झाला हे पाहणेही आवश्यक आहे.