जगामध्ये विविध धर्मांचे अस्तित्व असो, त्यांचा विकास होवो, विविध भाषांमधील, विविध सुरांमधून परमेश्वराचा महिमा गायला जावो. ते आदर्शवत असेल. विविध धर्मांमधील भेदांचा आदर करा आणि जोपर्यंत ते एकतेची ज्योत विझवत नाहीत तोपर्यंत ते धर्म वैध आहेत असे माना. मी कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करण्यासाठी वा कोणत्याही धर्माचा नाश करण्यासाठी आलेलो नाही याउलट, प्रत्येकाला आपापल्या धर्मात उत्तम प्रकारे स्थित होण्यास पुष्टी देण्यासाठी म्हणजेच ख्रिश्चनांनी उत्तम ख्रिश्चन बनावे मुस्लिमांनी उत्तम मुस्लिम बनावे आणि हिंदूंनी उत्तम हिंदू बनावे ह्यासाठी मी आलो आहे.—- बाबा
स्वामी सतत मानवजातीस सर्वधर्म ऐक्याचे स्मरण करून देतात. मनुष्याच्या बंधूभावास आणि परमेश्वराच्या पितृभावास प्रोत्साहन देण्यासाठी आपण ही सर्वधर्म भजने गाऊया.