क्लॅरिअन कॉल (कृतीसाठी घोषणा)
उद्देश:
हा एक चैतन्यपूर्ण उपक्रम आहे ज्यामुळे मुलांना आपल्यातील बुजरेपणा, मनाची द्विधा अवस्था किंवा अनिश्चितता या दोषांवर मात करण्यास तसेच आपल्या समवयस्क गटाशी मैत्री प्रस्थापित करून त्या मुलांमध्ये सहजपणे मिसळता येण्यासही मदत होते.
रुजविली जाणारी मूल्ये
- आत्मविश्वास
- संघामध्ये मैत्रीपूर्ण संबंध
- इतरांशी मैत्रीपूर्ण संबंध
साहित्य:
संगीत (वैकल्पिक)
खेळ कसा खेळावा
- गुरूंनी मुलांना गोल करून उभे करावे व हात धरून गोल फिरायला सांगावे व संगीत चालू ठेवावे.
- त्यानंतर गुरूने मोठ्याने एक संख्या सांगावी, उदा. 3, त्यानंतर मुलांनी 3-3 चे गट करून हात धरून उभे राहावे.
- जर सांगितलेली संख्या 5 असेल तर मुलांनी 5-5 चे गट करून उभे राहावे.
- अर्धा किंवा पाव या संख्याही जर धरल्या तर खेळामध्ये अजूनच मजा येईल. अर्धा ही संख्या दर्शविण्यासाठी मुलांनी वाकावे व पाव ही संख्या दर्शविण्यासाठी मुलांनी खाली बसावे. (उदा. जर एकूण 9 मुले असतील आणि गुरूंनी आठ + 1/4 (पाव) अशी संख्या सांगितली तर आठ मुलांनी उभं राहून हात धरून गट करावा आणि नवव्या मुलाने खाली बसावे (1/4).
गुरूंना सूचना:
- हा खेळ जरा icebreaker प्रमाणे आहे. काही वेळेस गुरूंच्या असे लक्षात येते की काही मुले सहजपणे आपल्या समवयस्क मुलांमध्ये मिसळत नाहीत आणि केवळ एक किंवा दोन मुलांबरोबरच त्यांची मैत्री होऊ शकते. अशा मुलांना या खेळामुळे इतर मुलांशी सहजपणे मैत्री करण्यास मदत होते.
- हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी गुरूने हे पाहणे महत्वाचे आहे की गोल करताना मुलांना त्यांच्या खास मित्रांबरोबर उभे न करता कसेही उभे करावे.