तुमच्या कृतीकडे लक्ष द्या
उद्देश:-
हा उपक्रम, शब्द आणि कृती एकाच वेळी घडणे याचे जे महत्व आहे त्यावर भर देतो. दोन्हींमधील विसंगती इतरांना चुकीचे मार्गदर्शन करते.
संबंधित मूल्ये:-
- एकाग्रता
- सावधानता
- जागरूकता
खेळ कसा खेळावा:-
- गुरूंनी वर्गाला स्पष्ट करून सांगावे की मुलांनी जे हातवारे करायचे आहेत ते गुरूंच्या आज्ञेनुसार असावेत आणि गुरूंच्या हातवाऱ्यांनुसार नसावेत.
- गुरूंनी हा खेळ अजून स्पष्ट करून सांगावा.
- जेव्हा गुरु -साईराम- म्हणतील तेव्हा मुलांनी दोन्ही हात वर करून हातांचे तळवे स्वतःकडे करावेत.
- तर जेव्हा गुरु -राधेश्याम- म्हणतील तेव्हा मुलांनी दोन्ही हात वर करून हातांचे तळवे बाहेरच्या बाजूला करावेत.
- सर्वप्रथम गुरु दोन्ही नावे आळीपाळीने म्हणत जातील (उदा. साईराम- राधेश्याम).
- परंतु गुरु हळूहळू आपल्या म्हणण्याचा वेग वाढवत जातील आणि- साईराम, राधेश्याम, राधेश्याम, राधेश्याम, साईराम असे कसेही म्हणू शकतील.
- गुरुंचे हातवारे त्यांच्या आज्ञेनुसार असतीलच असे नाही आणि या मुद्यावरच भर दिला पाहिजे.
- खेळ सुरु होतो. मुले बहुतांशी त्यांना जे सांगितले आहे त्यापेक्षा त्यांना जे दिसते त्याचेच अनुकरण करतात असे लक्षात येते.
- खेळ चालू राहतो आणि जी मुले गुरूंच्या आज्ञेविरुद्ध हातवारे करतात ती एक एक करून खेळातून बाहेर होतात. जो शेवटपर्यंत बाहेर जात नाही तो जिंकतो.
गुरूंना सूचना:-
- वर्गातील चर्चा- मुलांची धाकटी भावंडे आपले मोठे बहीण-भाऊ जे करतात त्याचेच अनुकरण करतात (खेळामधून सिद्ध झाल्याप्रमाणे). म्हणून आपल्या धाकट्या भावंडाना सल्ला देण्याआधी मोठ्यांनी स्वतःच्या कृतीबाबत सावध असावे.