गुरुकृपा शाश्वत तेज प्रदान करते
शंकर हे एक महान आचार्य होते. तोटका, हस्तमालका, सुरेश्वर आणि पद्मपाद हे त्यांचे चार प्रमुख शिष्य होते. त्यातील पद्मपाद केवळ गुरुंची सेवा करण्यासाठी तत्पर असे.
धडे शिकण्यात त्याचे लक्ष लागत नसे.
अभ्यासातील त्याचे मागासलेपण पाहुन इतर विद्यार्थी त्याचा उपहास करत असत. परंतु गुरूंप्रतीअसलेल्या अतीव आदराने त्याची भरपाई होत असे.
एक दिवस त्याने नदीवर गुरुंची वस्त्रे धुतली व नदीच्या मध्यात असलेल्या खडकावर वाळत घालुन सुकवली. तो वस्त्रांच्या घड्या घालत असताना अचानक नदीला पूर आला. त्याला पाय ठेवण्यासाठी खडकावर अगदी अपूरी जागा होती. उशीर झाला होता, गुरुंना लवकरच त्यांची धुतलेली वस्त्रे लागतील ह्या विचाराने पद्मपादाने प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यावरून चालत पलीकडे जाण्याचे ठरवले. त्याच्या गुरुंचे आशीर्वाद त्याचा बचाव करतील हे तो जाणत होता. आणि तसेच घडले. जेथे जेथे त्याने पाय टाकला, तेथे एक बलशाली कमळ विकसित होऊन त्याला आपल्या पाकळ्यांवर उचलून धरत होते. आणि म्हणून त्याला पद्मपाद ह्या नावाने संबोधू लागले.
गुरुकृपेने त्याला सर्व ज्ञानावर प्रभुत्व प्राप्त झाले व प्राचीन ज्ञानाचा बुद्धीमान पुरस्कर्ता म्हणून त्याची ख्याती झाली.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुकृपा शास्वत तेज प्रदान करते.
[Source: China Katha – Part 1 Pg:2]
Illustrations by Ms. Sainee &
Digitized by Ms.Saipavitraa
(Sri Sathya Sai Balvikas Alumni)