कर्माची पवित्र फळे
शनिवारचा दिवस होता, वडील देवांची पूजा करण्यात व्यस्त होते. त्यांनी त्यांच्या मुलाला हाक मारून एक रुपयाची केळी आणण्यास सांगितले.
हा एक चांगला मुलगा होता. त्याने केळी विकत घेतली व तो घरी येत होता. वाटेत त्याला आई आणि मुलगा रस्त्यावर उभे असलेले दिसले. ते दोघेही खूप भूकेले होते.त्या मुलाने जेव्हा त्या दोघांना भूकेने व्याकुळ झालेले पाहिले तेव्हा त्याच्या मनात विचार आला की ही केळी घरी घेऊन जाण्यापेक्षा ह्या भूकेलेल्या लोपाणीही आणून दिले.
तहान भूक शमल्यामुळे त्या दोघांनाही खूप बरे वाटत होते. त्यांनी पुन्हा पुन्हा आपली कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
विद्यार्थी रिकाम्या हाताने घरी आला. वडिलांनी त्याला केळी आणली का असे विचारले. त्यावर तो हो म्हणाला. केळी कोठे आहेत ह्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले की त्याने आणलेली केळी पवित्र आहेत. ती कधीही सडणार नाहीत आणि दिसू शकणार नाहीत.
मुलाने वडिलांना सगळी हकीकत सांगितली की कशी त्याने दोन भुकेल्या जीवांना केळी दिली.
त्याने घरी जी फळे आणली ती केवळ कर्माची पवित्र फळे होय.
आपला मुलगा सदाचारी आहे असे वडिलांच्या मनात आले व त्यांच्या सर्व प्रार्थनांना त्या दिवशी प्रतिसाद मिळाल्याची त्यांना जाणीव झाली.
त्या दिवसापासून वडिलांच्या मनात मुलाविषयी अत्यंत प्रेम दाटून आले आणि त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.
सतकर्मांच्या फळांने परमेश्वर अति प्रसन्न होतो.
[Source: China Katha – Part 1 Pg:5]
Illustrations by Ms. Sainee &
Digitized by Ms.Saipavitraa
(Sri Sathya Sai Balvikas Alumni)