त्याच्या स्वतःच्या उशीखाली
एक श्रीमंत व्यापारी एकदा मंदिराच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्या तीर्थ क्षेत्री गेला होता. त्याचे पाकीट मारण्याच्या हेतूने एक चोरही त्याचा पाठलाग करत तेथे गेला.
आपणही त्या उत्सवात सहभागी होण्यासाठी जात असल्याचे त्याने व्यापाऱ्यास भासवले. रात्री त्या दोघांनी एका धर्मशाळेत मुक्काम केला.
सर्वजण गाढ झोपी जाईपर्यंत चोर जागा राहिला. सगळे गाढ झोपल्यावर चोर उठला व व्यापाऱ्याचे पैशाचे पाकीट शोधू लागला खूप शोध घेऊनही त्याला पाकिट मिळाले नाही.
दिवस उघडल्यावर तो त्या व्यापाऱ्यास मित्रत्वाचा आव आणून म्हणाला,” ह्या ठिकाणी चोरांचा वावर आहे. तुम्ही तुमच्या पैशाचे पाकिट सुरक्षित ठिकाणी ठेवलेत ना?” व्यापारी त्यावर म्हणाला,” हो, हो, काल रात्री मी ते तुमच्याच उशीखाली ठेवले होते. पाहा किती सुरक्षित जागा आहे ती.!” असे म्हणून त्याने ते त्याच्या उशीखालून काढून घेतले.
परमेश्वर त्या श्रीमंत व्यापाऱ्यासारखा आहे. त्याने आत्मशांती, आत्मज्ञान आणि निर्मळ आनंद ह्यांच्या ठेव्याची थैली मनुष्याच्या मस्तकामध्ये ठेवली आहे. परंतु मनुष्याला हे ज्ञात नाही. तो त्याचा बाह्य जगतात शोध घेतो..
[Ref: China Katha – Part 1 Pg:188]
Illustrations by Ms. Sainee
Digitized by Ms.Saipavitraa
(Sri Sathya Sai Balvikas Alumni)