स्वामींनी म्हटले आहे कि प्रत्येक व्यक्तिस त्यांच्या हृदयात वास करणाऱ्या परमेश्वराकडून बोलावणे येईल. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी शांतपणे ध्यानाला बसाल तेव्हा परमेश्वराचे रूप तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्याचे नाम घ्या. हे दोन्ही कधीही बदलू नका. जे तुम्हाला आनंद देते त्याला धरून ठेवा. ध्यान करताना मन कशाच्या तरी मागे धावत असते. ते इतरत्र धाव घेते.नाम आणि रूप ह्याद्वारे तुम्ही ती वाट बंद केली पाहिजे आणि परमेश्वराच्या चिंतनात व्यत्यय येणार नाही ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. जर पुन्हा तसेच घडले तर तात्काळ नाम आणि रूपाचा वापर केला पाहिजे. ध्यान करू लागल्यावर, सुरुवातीस इतस्ततः धावणाऱ्या विचारांना एकत्रित करण्यासाठी परमेश्वराचे स्तवन करणारे काही श्लोक म्हणा. त्यानंतर हळुहळु, नामस्मरण करताना डोळ्यासमोर त्या नामाचे प्रतिनिधित्व करणारे रूप आणा.
रूपावर ध्यान
-
वर्णन
-
प्रात्यक्षिक
-
पुढील वाचन