स्वामींच्या जवळ वा दूर
नमुना क्रिया
- आपल्या हातांनी करता येणाऱ्या विविध कृती यादी करण्यास मुलांना सांगा.
- त्या क्रिया “चांगल्या” आणि “चांगल्या नाही” श्रेणीमध्ये वर्गीकृत करण्यास सांगा.
- यातील प्रत्येक क्रिया कागदाच्या लहान तुकड्यांवर लिहा आणि कागदाच्या तुकड्यांची घडी करा हे सर्व तुकडे एका पेटीत टाका आणि ते चांगले मिसळा.
- प्रत्येक मुलाला पेटीतून एक कागद उचलायला सांगा.
- मुलाने उचललेल्या कागदावर चांगली कृती असल्यास, मुलाला वर्गात स्वामींच्या वेदीपाशी (किंवा छायाचित्र) च्या पुढे उभे रहाण्यास सांगा.
- मुलाने एखादी— चिठ्ठी उचलल्यास मुलाला वेदी (अल्टार) किंवा छायाचित्रापासून दूर खोलीच्या दुसर्या टोकाला उभे राहण्यास सांगा.
“चांगली” क्रिया | “चांगली नसलेली (वाईट)” क्रिया |
---|---|
लिखित जप | भिंतीवर नखाने खरडणे |
इतरांबरोबर आपली वस्तु वाटून घेणे | इतरांना विचारल्याशिवाय त्यांच्या वस्तू घेणे |
इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी टाळ्या वाजवणे | इतर खाली पडतात, तेव्हा टाळ्या वाजवून हसणे |
इतरांना मदत करणे | इतरांना मारणे, चिमटे काढणे |
शाळेत/बालविकास वर्गात नोट्स लिहिणे | परीक्षेत कॉपी करणे |
आईला मदत करणे | अन्न वाया घालवणे/ फेकून देणे |
झाडांना पाणी देणे | गरज नसतांना पाने, फुले तोडणे |
शिकविलेले मूल्य
नेहमी चांगले करावे.
चांगले केल्याने आपण देवाजवळ जाऊ.
आपले हात नेहमी चांगल्या कामांसाठी वापरा आणि इतरांना मदत करा.