बौध्द धर्माची प्रमुख शिकवण उदात्त अष्टांगिक मार्ग
- सम्यक दृष्टि योग्य रितीने जीवनाचा विचार करणे म्हणजे ज्ञान व करुणा भावासह बुद्धाच्या नजरेतून विश्वाकडे पाहणे.
- सम्यक संकल्प: जसे आपले विचार तसे आपण बनतो. निर्मळ आणि दर्याद्र विचारांमधून खंबीर व चांगले चारित्र्य घडवले जाते.
- सम्यक वाणी:वाणीमध्ये कोमल आणि उपयुक्त शब्दांचा वापर केला तर आपणास सर्वांकडून आदर मिळतो व त्यांच्या विश्वासास पात्र ठरतो.
- सम्यक वर्तन:आपण काय म्हणतो हे महत्त्वाचे नाही. आपल्या वर्तनावरून इतरजण आपल्याला ओळखतात. इतरांची निंदा करण्या आगोदर आपण काय करतो ते प्रथम पाहिले पाहिजे.
- सम्यक उपजीविका: कोणालाही इजा पोहोचणार नाही असा व्यवसाय वा नोकरी निवडली पाहिजे. बुध्द म्हणतात,” इतरांना इजा पोहचवून तुम्ही उदरनिर्वाह करू नका. इतरांना दुःख देऊन आंनद शोधू नका.”
- सम्यक प्रयत्न: सार्थ जीवन म्हणजे सदैव चांगले करत राहणे इतरांविषयी सदिच्छा बाळगणे. आपल्याला वा इतरांना इजा पोहोचेल अशा कोणत्याही गोष्टीवर प्रयत्न वाया न घालवणे.
- सम्यक सावधानता: आपले विचार, उच्चार आणि आचार ह्याविषयी सावध असलेला ,त्याची जाणीव असलेला असा ह्याचा अर्थ आहे.
- सम्यक ध्यान: एका वेळी एका विचारावर वा एका वस्तुवर लक्ष केंद्रित करणे. असे केल्याने आपले मन स्थिर होते. व खरी मनःशांती लाभते.
ह्या उदात्त अष्टांगिक मार्गाच्या अनुसरषाची तुलना बागेची मशागत करण्याशी केली जाऊ शकते. तथापि बौद्ध धर्मात मनुष्य त्याच्या ज्ञानाची मशागत करतो. मन ही जमीन आहे व विचार बीज आहेत. कर्म ही बागेची देखभाल करणारे मार्ग आहेत. आपले दोष व दुर्गुण तण आहेत. बागेतील तण उपटून काढतो त्याप्रमाणे त्यांचे समूळ उच्चाटन करायचे आहे. खरा आणि चिरस्थायी आनंद हे त्याचे फलित आहे.