इस्लामची प्रमुख शिकवण
इस्लामचे आचरण करण्यासाठी मूलभूत अत्यावश्यक बाबी धर्माच्या पाच स्तंभांमध्ये सूत्रबध्द केल्या आहेत. त्या खालील प्रमाणे
- परमेश्वर एकच आहे, तो म्हणजे अल्ला आणि महम्मद त्याचा प्रेषित आहे.
- नमाज पढणे हे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचे कर्तव्य आहे नेमून दिलेल्या प्रार्थना दिवसातून ५ वेळा म्हटल्या पाहिजेत.
- रामदानच्या महिन्यात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत उपवास करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
- गरजूंना (झकत) दानधर्म करणे हे धार्मिक कर्तव्य आहे.
- शक्य असेल तर आयुष्यात किमान एकदा तरी मक्केस जाऊन हाजयात्रा केली पाहिजे.
[(श्री सत्यसाई बालविकास मार्गदर्शिका २ मधून)]