उद्दिष्ट
- ‘तीर्थयात्रा’ हा एक सांघिक उपक्रम असून, यांत मुले मनानेंच यात्रेला जातात व ते विविध तीर्थक्षेत्र आणि त्यांच्याशी संबंधित देव-देवतांना भक्तीभावाने आणि श्रद्धेने आठवतात.
- आपल्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध वारशाबद्दल या खेळात भर देण्यात आला आहे.
संबंधित मूल्ये
- कल्पनाशक्ती
- एकाग्रता
- स्मरणशक्ती
- भक्तिभाव
- कुतूहल/ जिज्ञासा
खेळ कसा खेळायचा
- गुरु मुलांना गोल करून बसायला सांगेल.
- ती मुलांना उदाहरण देऊन हा खेळ कसा खेळायचा हे समजावून सांगेल.
- पहिला मुलगा म्हणेल, “मी यात्रेला पुरीला गेलो होतो आणि मला भगवान जगन्नाथांचे दर्शन झाले.”
- या पद्धतीने खेळ पुढे चालत राहील आणि प्रत्येक मूल पवित्रस्थान आणि त्याच्याशी जोडलेली देवता यांची नांवे सांगेल.
- मुलांनी आधीच सांगितलेल्या तीर्थक्षेत्राचे नांव जर एखाद्या मुलाने पुन्हा घेतले, किंवा त्याने कोणत्या स्थळाला भेट दिली, हे नंतर तो विसरला, तर तो मुलगा खेळातून बाद होईल.
गुरुंसाठी सूचना
- हा खेळ खेळून झाल्यावर त्या तीर्थक्षेत्रांच्या महत्त्वाबद्दल वर्गात चर्चासत्र घेता येईल.
- जर पूर्वी मुलांनी अशा पवित्र मंदिरांना प्रत्यक्ष भेट दिली असेल, तर ते आपला स्वतःचा अनुभव वर्गात सांगू शकतात.
- हा खेळ ऑनलाइन पण चांगल्याप्रकारे खेळता येईल.