वंदे देवं उमापतिं श्लोक – उपक्रम
१) गुरुंनी श्लोक व त्याचा सम्पूर्ण अर्थ समजावून सांगावा.
२) श्लोकाच्या अर्थामधून काही निवडक शब्द गुरुंनी फळयावर लिहावे. उदाहरणार्थ – उमापति, दैवीगुरु. सर्प आभूषण असलेल्या; सूर्य, चंद्र व अग्नी हे ज्याचे त्रिनेत्र आहेत असा देव इत्यादि.
३) नंतर वर्गातील एका मुलाला भगवान शंकरांचे रुपात नाटयीकरण सादर करण्यांस सांगावे. (गुरुंनी त्या मुलांस भगवान शंकरांचा वेश परिधान करण्यास सांगावे किंवा ते वर्गामध्ये भगवान शंकराचे चित्र ठेवू शकतात).
४) वर्गातील इतर मुलांनी एकट्याने किंवा वर्गातील मुलांच्या संख्येनुसार दोन मुलांचा एकेक गट करून स्वतः आपली प्रार्थना लिहावी. त्यात फळयावर लिहिलेल्या काही महत्त्वाच्या किंवा जास्तीत जास्त शब्दांचा उल्लेख प्रार्थनेत करावा. अशा प्रार्थनेचे एखादे उदाहरण – पुढीलप्रमाणे असू शकते. – “मी – उमापति, दैवीगुरु सर्व प्राणीमात्रांचा देव आणि सर्प ज्याचे आभूषण आहे – अशा देवाला वंदन करतो कृपया मला सुखी करावे.”
५) नंतर मुलांना आपापल्या प्रार्थनेचा अभ्यास करण्यास सांगावे. आणि प्रत्येकाने किंवा एकेका गटाने पुढे येऊन आपली प्रार्थना सादर करावी. नाट्यकथातील ही प्रार्थना भक्तिभावाने सादर करून जणू हे पुष्प भगवान शिवांना त्यांनी अर्पण करावे.
या उपक्रमासंबंधी – आढावा
हा एक गंमतीचा प्रयोग असणार आहे. त्यातून मुलांच्या मनात भगवान शकराबद्दल भक्ती निर्माण होईल व ते प्रदर्शित करणारी मूल्ये, सद्गुण मुले जाणतील. हा उपक्रम गाठ १च्या तृतीय वर्षातील मुलांसाठी असल्याने तो थोडा आव्हानात्मक होण्यासाठी आपण त्यांना गुण देऊ शकतो. गुण देतांना मुले किती चांगल्या प्रकारे प्रार्थना म्हणत आहेत व त्यांच्या सादरीकरणात मूळ प्रार्थनेतील, श्लोकांतील, शब्दांचा उल्लेख किती प्रमाणात त्यांनी केला आहे, या आधारे गुण द्यावे या पाठानंतर ही प्रार्थना सर्व मुलांनी वर्गात एकत्र म्हणावी. व त्याचा अर्थ सांगावा.