वंदे देवम उमापतिं श्लोक – पुढील वाचन
वंदे देवम
परमेश्वर विश्वाची निर्मिति करतो, पोषण करतो व संहार करून, पुन्हा प्रारंभिक स्थिती आणून ठेवतो.
शिव हे एक दिव्यत्वाचे स्वरुप आहे, जे विभाजन आणि संहार शक्तीचे प्रतिनिधित्व करते.
ते परमेश्वराचे वैराग्य स्वरुप आहे, पूर्णतः अनासक्त.
जो मंगलकारक आहे त्याला शिव म्हणतात. ज्या गोष्टी आपल्याला, परमेश्वराचे प्रेम, शांती आणि शक्तिपासून दूर नेते त्या सर्वांचा ते नाश करतात. उदा – भ्रांती लोभ, मत्सर, क्रोध ह्यासारख्या मनुष्याच्या अंतस्थ शत्रूंचा संहार करून ते मांगल्य प्रदान करतात.
तेज, शुचिता आनंद ह्यांचे परमधाम कैलास हे त्यांचे निवासस्थान आहे.
प्रतिमात्म्क कल्पना
संन्यास रूप वैराग्य आणि पूर्ण अनासक्तीचे प्रतिक आहे. तिसरा नेत्र ज्ञानचक्षुचे प्रतिक आहे. परमेश्वर सर्वज्ञ, सर्वसाक्षी व सर्वशक्तिमान आहे. भस्मविलेपित देह – त्यांच्या भक्तांची पापे भस्मसात करतात व त्या भस्माने स्वतःला विभूषित करतात. सर्प – आध्यात्मिक शक्तीचे प्रतिक आहे.
त्यांच्या जटांमधून उद्भवणारी गंगा, ज्ञानगंगेचे, ऋषिमुनीकडून प्रवाहित होणाऱ्या ज्ञानाच्या स्रोताचे प्रतीक आहे. गंगेमध्ये बुडी मारल्याने अनेक जन्मांमधील अनंत पाप धुतली जाऊन मांगल्य प्रदान केले जाते.
त्रिशूल – ते भूत, वर्तमान आणि भविष्य ह्या तिन्ही कालांचे, भू (स्थूल), भुवः (सूक्ष्म) आणि सुवः (कारण) ह्या अवकाशाच्या त्रिमितींचे, प्रकृतिचे नियमन करणाऱ्या सत्व (समचित्त, प्रसन्नता व संयम), राजस (तीव्र भावना, महत्त्वाकांक्षा, इच्छावासना व अस्वस्थता) आणि तमस (अज्ञान, आळस व नीरसता) ह्या त्रिगुणांचे स्वामी आहेत.
कमंडलु: ते जरी विश्वनियंता असले तरी ते भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागणारे भिक्षुक आहेत. प्रत्येकाच्या हृदयातून प्रेमाची भिक्षा मिळावी ह्यासाठी ते आरोळी देतात.
व्याघ्रांबर: क्रूर वाघ पशुवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो. शिवाने वाघाला मारून त्याचे कातडे वस्त्र म्हणून परिधान केले आहे. ह्यामधून पशुवृत्तीवर त्यांचे पूर्णतः नियंत्रण असल्याचे दर्शवले जाते.
चंद्राची कोर हे मनाचे द्योतक आहे. ते मनाचे स्वामी आहेत.