समाजातील हातांचे कार्य
उद्दिष्ट
विविध व्यवसायातील व्यक्ती समाजासाठी कोणते चांगले काम करतात, हे जाणून घेत असताना मुलांना सहाय्यभूत होणारा, असा हा एक प्रेरणादायक खेळ आहे.
संबंधित मूल्ये
आपल्यातील कला कौशल्येआचरणात व व्यवहारात आणणे आणि समाजातील विविध व्यक्तींची भूमिका समजून घेणे.
आवश्यक साहित्य
मानवी मूल्यांच्या कार्डांचा संच.
गुरूंची पूर्वतयारी
काही नाही.
खेळ कसा खेळायचा
- वर्गातील मुलांचे २ गटात विभागणी करावी. दोन्ही गटातील मुले २ अर्धवर्तुळात बसून एकदम, एकाच वेळी खेळ खेळतील.
- समाजातील विविध व्यक्ती वेगवेगळी भूमिका निभावत असताना आणि प्रत्येक जण समाजाच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या परीने उत्तम काम करत असतो. याबद्दल गुरु मुलांना समजावून सांगतील.
- प्रत्येक गटातील एक खेळाडू गुरुंजवळ येईल आणि गुरू त्यांच्या कानात एका व्यवसायाचे नाव सांगतील. मुले आपापल्या गटात परत जातील आणि कोणताही आवाज न करता, न बोलता, ते त्या संबंधित व्यवसायाबद्दल अभिनय करून सांगतील.
- तो व्यवसाय सर्वात प्रथम ओळखणाऱ्या गटाला एक ‘मूल्याचे कार्ड’ मिळेल. प्रत्येक राउंड नंतर दोन्ही गटातील मुलांनी, त्या व्यवसायातील व्यक्ती समाजहिताचे कोणते काम करतात, हे विशद करावे.
- विविध व्यवसायातील व्यक्ती समाजाच्या हिताची कोणकोणती कामे करतात, त्यावर ह्या खेळातून प्रकाश टाकला जाईल. आणि तोच या खेळाचा उद्देश आहे.
- खेळ असाच पुढे चालू राहील आणि दरवेळी नवीन मुलांना विविध व्यवसायांबद्दल अभिनय करण्याची संधी मिळेल.
गुरुंसाठी सूचना
- जर वर्गात मुलांची संख्या कमी असेल, तर त्यांचे दोन गट पाडू नये. त्याऐवजी एकेका मुलाला संधी देऊन हा खेळ खेळता येईल.
- जो मुलगा व्यवसाय बरोबर ओळखेल, त्याला एक ‘मानवी मूल्य कार्ड’ मिळेल.
- अशा अनेक फेऱ्या झाल्यानंतर ज्या मुलाकडे सर्वात जास्त ‘मानवी मूल्यांची कार्डे’ जमा झाली असतील, तो विजेता ठरेल.