नेहमी मदत करा
उद्दिष्ट
मनोरंजक व परस्पर सुसंवादी कृती
संबंधित मूल्ये
सदाचरण, सेवा.
आवश्यक साहित्य
कार्ड
गुरुंनी करावयाची पूर्वतयारी
खाली दिल्याप्रमाणे विशेष गुण लिहिलेली कार्डे आणि कृतींची कार्डे गुरुंनी तयार केली पाहिजेत.
खेळ कसा खेळायचा
- वर्गातील मुलांची दोन गटात विभागणी केली पाहिजे.
- अ गटातील मुले गरजू लोकांना कोणती मदत हवी आहे, त्याचे वर्णन करतील.
- ब गटातील मुले मदतनिसांचे वर्णन करतील.
- गट अ मधील प्रत्येक सभासद गुणवैशिष्ट्यांचे एक कार्ड निवडेल आणि त्यातील व्यक्तींच्या
स्वभावाप्रमाणे, वृत्ती प्रमाणे सूचक हावभाव करतील. - ब गटातील प्रत्येक जण वृत्तींच्या कार्डांमधील एक निवडेल आणि त्यानुसार अ गटातील संबंधित
गरजू व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करेल. - एकदा व्यवस्थित योग्य जोड्या जमल्या, की त्यांनी आवश्यक ती अपेक्षित कृती करावी.
- आता दोन्ही गट कार्डांची अदलाबदल करतील, त्यामुळे ब गट गरजूंचे वर्णन करेल आणि अ
गटातील मुले मदतनिसांच्या नावानुसार वर्णन करतील आणि ब गटातील संबंधित गरजू
व्यक्तीला शोधतील.