चांगले पाहा
उद्दिष्ट-
इतरांमधील चांगले पाहण्यास शिकणे, हा या खेळातील कृतींचा उद्देश आहे, कारण आपल्या भगवानांनी आपल्याला याबद्द्ल नेहमी आग्रहाने सांगितले आहे.
संबंधित मूल्ये-
प्रेम, स्तुती /तारीफ
आवश्यक साहित्य –
चिठ्ठ्या ज्यातील प्रत्येकावर एका मुलाचे नाव असेल. बाऊल, संगीत/भजन खेल कसा खेळायचा
- गुरु मुलांना वर्तुळ करुन बसायला सांगतील
- ती सर्व चिठ्ठ्या बाऊलमध्ये ठेवेल आणि तो एका मुलाच्या हातात देईल आणि ते मूल तो बाऊल पुढील मुलाच्या हातात देईल व तो क्रमाने पुढेपुढे मुलांच्या हातात देत जाईल.
- संगीत सतत चालू राहील.
- जेव्हा संगीत थांबेल, तेव्हा ज्या मुलाच्या हातात बाऊल असेल, ते मूल एक चिठ्ठी उचलेल आणि त्यावरील नाव वाचेल. (उदा.- उमा)
- आता ज्या मुलाच्या हातात चिठ्ठी असेल, त्याने उमाचा एक सद्गुण सांगयचा (आस्था)
- आता उमा हे नाव असलेली चिठ्ठी बाद होईल, टी काढून टाकायची.आणि संगीत सुरु करुन बाऊल मुलांनी पुढे, पुढे द्यायचा.
- मुलांच्या नावांच्या सर्व चिठ्ठ्या संपेपर्यंत खेळ चालू राहील आणि प्रत्येक मुलला संधी मिळेल.
- एखाद्या मुलाने नेमकी स्वतःच्या नावाची चिठ्ठी उचलली, तर त्याने आपल्यातील दुर्गुण किंवा वाईट सवय सांगावी. (उदा.- क्रोध/राग येणे )
गुरुंसाठी सूचना-
इतरांचे सद्गुण आणि चांगल्या सवयी शोधणे आणि त्याचे अनुकरण करणे , याकडे मुलांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच स्वामींनी आपल्याला वारंवार सांगितले आहे, त्यानुसार इतरांवर टीका करण्यापेक्षा आपल्यांतील दुर्गुण आणि वाईट सवयी ओळखून त्या घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण, टीका हे आपल्या जीव्हेकडून होणारे एक मोठे पाप आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर वर्गात चर्चा करावी.