विषय
कोणत्याही मन विचलित करणाऱ्या परिस्थितीत सुद्धा मनाचे संतुलन बिघडू न देणे, यासाठी मनोबल वाढवणे- हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
संबंधित मूल्ये
आत्मसंयम, चिकाटी/सहनशीलता, शांति, मौन/स्तब्धता
खेळ कसा खेळायचा
- गुरुने वर्गातील मुलांची २ गटात विभागणी करावी
- अ गटातील १ मूल पुढे येऊन शांत, स्तब्ध बसेल.
- यानंतर बी गटातील मुले, अ गटातील शांत बसलेल्या मुलाला स्पर्श न करता, वेगवेगळ्या पद्धतीने (विनोद सांगून, विचित्र हालचाली करून वगैरे) त्याचे चित्त विचलित करायचा प्रयत्न करतील.
- त्यांच्या विनोदामुळे क्षुब्ध वा विचलित न होता, जर तो मुलगा शेवटपर्यंत शांत राहिला, तर तो त्याच्या गटाला एक गुण मिळवून देईल आणि आता पुन्हा त्यांच्याच गटातील एक मुलगा पुढे येईल व त्याच्या जागी बसेल.
- पण जर त्यांच्या विनोदाला बळी पडून तो विचलित झाला व मध्येच त्याच्या शांतीचा, मौनाचा भांग झाला, तर तो खेळातून बाद होईल आणि ब गटाला एक गुण मिळेल.
- आता ब गटातील मुलगा पुढे येईल व समोर बसेल आणि अ गटातील मुले त्याचे चित्त विचलित, करायचा व त्याची शांति भंग करायचा प्रयत्न करतील
- या प्रकारे खेळ चालू राहील आणि ज्या गटाला जास्तीत जास्त गुण मिळतील, तो विजेता ठरेल.