बाबांचे प्रगाढ प्रेम
कारुण्यानंद नावाचे स्वामी बाबांबद्दल अत्यंत श्रद्धा बाळगून होते. कुष्ठरोग्यांसाठी दवाखाना व निराधार व अपंग लोकांसाठी आश्रमाची सोय करणारे एक कनवाळू व्यक्ती होते. एके दिवशी एका गरीब गर्भवती स्त्रीस घेऊन एकजण या विचाराने आला की इथे तिला आश्रय व काही मदतही मिळेल. तिच्याबरोबर तिचा छोटा मुलगासुद्धा होता. कारुण्यानंदांनी तिला दाखल करून घेतले. मुलगा आणि तिच्याकडे लक्ष ठेवायला एका महिलेची नियुक्तीपण त्यांनी केली. इस्पितळात फक्त एकच डॉक्टर व एकच नर्स होती.
बाळाच्या जन्माला तसा अवकाश होता म्हणून एके संध्याकाळी सारे कर्मचारी सिनेमा बघायला गेले ते मध्यरात्रीच परतले, येताच नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळेच चक्रावले. डॉक्टर व नर्स धावतच त्या महिलेजवळ गेले. बघतात तो काय? बाळ पाळण्यात होते आणि स्वच्छ पांढऱ्या टॉवेलमध्ये गुंडाळलेले होते. आईची पण व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती. त्यांनी विचारले की हे सर्व कुणी केले? ती म्हणाली, ‘मी आवाज देत होते आणि प्रार्थना पण करीत होते. माझं सौभाग्य की एका नर्सने माझा ओरडा ऐकला आणि ती तत्परतेने माझ्या मदतीला आली.’ काय, नर्स? अविश्वासाने डॉक्टरांनी विचारले. इथे तर दुसरी कोणी नर्स नाही. महिलेने स्वामीच्या तिथल्या चित्राकडे बोट दाखवीत म्हटले, ‘हीच ती नर्स जिने माझी मदत केली. आतापर्यंत तर इथेच होती. बहुतेक दुसऱ्या लोकांची देखभाल करायला गेली असेल.’
पुढे जेव्हा स्वामी कारुण्यानंद पुट्टपतींला गेले तेव्हा त्यांनी काही सांगण्याअगोदर बाबानीच त्यांना चिमटा काढला.”लक्षात ठेवा इस्पितळात सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवत जा की लागणाऱ्या वस्तू शोधण्यात किती वेळ गेला. माझा. स्वामीजी समजून चुकेल की बाबांशिवाय अन्य कोण अशी लीला करू शकणार. करुणायमी प्रेममयी अशी साईमाच त्या दिवशी अवतीर्ण झाली होती हेच खरे.