- साई नाम बोलो सत्य साई नाम बोलो
- साई माधवा साई केशवा श्रीहरी नाम बोलो
- अल्लाह ईश्वर इसा मसीहा
- बुद्ध महावीर नाम
- साई माधवा साई केशवा श्रीहरी नाम बोलो
साई नाम बोलो सत्य साई नाम बोलो
भजनाचे बोल
अर्थ
आपल्या प्रिय सत्यसाई प्रभूंचे नामस्मरण करा. साई माधव, साई केशव आणि श्रीहरी ह्या भगवान विष्णूंच्या नामांचे उच्चारण करा. अल्ला, ईश्वर, येशू,बुद्ध आणि महावीर यांच्या नामांचे उच्चारण करा.
स्पष्टीकरण
साई नाम बोलो सत्यसाई नाम बोलो | साई नामाचे उच्चारण करा! सत्यसाई नामाचे उच्चारण करा |
---|---|
साई माधवा साई केशवा श्रीहरी नाम बोलो | हे प्रभू साई! तुम्ही या विश्वाचे स्वामी आहात. तुम्ही केशी नावाच्या दैत्याचे मर्दन केले! तुम्ही आमच्या सर्व चिंता काळज्या आणि आमच्या आध्यात्मिक मार्गावरील सर्व अडचणी दूर करता! आम्ही तुमच्या नामाचे उच्चारण करतो. |
अल्ला ईश्वर इसा मसीहा | अल्ला शिवा आणि जीझस यांच्या नामाचे उच्चारण करा! |
बुद्ध महावीर नाम | बुद्ध आणि महावीर यांच्या पवित्र नामांचे उच्चारण करा! |
साई माधवा साई केशवा श्रीहरी नाम बोलो | हे प्रभू साई! तुम्ही या विश्वाचे स्वामी आहात. तुम्ही केशी नावाच्या दैत्याचे मर्दन केले! तुम्ही आमच्या सर्व चिंता काळज्या आणि अडचणी दूर करता! आम्ही तुमच्या नामाचे उच्चारण करतो! |
राग: दरबारी कानडा (कर्नाटिक)
श्रुती: सी (पंचम)
दरबारी (हिंदुस्तानी) ताल: कहरवा किंवा आदिताल-मात्रा ८
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_14/01MAY16/Bhajan-Tutor-Sai-Nam-Bolo-Sathya-Sai-Nam-Bolo.htm