श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ५)

Print Friendly, PDF & Email
श्री सत्य साई सुप्रभातम (कडवे ५)
ऑडिओ
श्लोकाचे बोल
  • आदाय दिव्यकुसुमानि मनोहराणि
  • श्रीपादपूजनविधिं भवदङ्घ्रिमूले।
  • कर्तुं महोत्सुकतया प्रविशन्ति भक्ता:
  • श्री सत्य साई भगवन् तव सुप्रभातम् ।।
अर्थ

भक्त सुंदर रंगांची पवित्र फुले घेऊन शास्त्रविधीनुसार आपल्या कमलचरणांची पूजा करण्यासाठी आपल्या पायाशी येत आहेत.
ते मोठ्या उत्साहाने व उत्कंठेने येतात.हे प्रभू, भगवान श्री सत्य साई, ह्या शुभ्र प्रभातीस प्रभातीस (मंगल प्रभातीस) मी तुम्हाला वंदन करतो.

स्पष्टीकरण
आदाय आणून
दिव्य स्वर्गीय
कुसुमानि फुले
मनोहराणि आकर्षक आणि मोहक
श्रीपाद पूजन प्रभूच्या कमलचरणांची पूजा
विधि शास्त्रात सांगितलेली पद्धत
भवदङ्घ्रिमूले आपल्या पवित्र पायांशी
कर्तुम् करण्यासाठी
महोत्सुकतया मोठ्या उत्साहाने व उत्सुकतेने
प्रविशन्ति प्रवेश करीत आहेत
भक्ता: भक्तजन
श्री सत्य साई सुप्रभातम (आदाय दिव्य …)
स्पष्टीकरण :

सद्गुरुप्राप्तीचा महान दिवस आपल्या हृदयात उगवला की आपली आयुष्ये बदलून जातात आणि आपण आपल्या गुरुविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो. जीवनाचा खरा हेतु पायरीपायरीने तोच आपल्याला समजावून देतो. अंतिम सत्याच्या ध्येयासाठी आपण प्रवास सुरु करतो, नामसंकीर्तनाने आपण आपली मने शुद्ध व स्वच्छ केल्यावर आपल्या जाणिवेची पातळी उंचावते, आता भगवत् स्वरूप असलेल्या सद्गुरूंशी आपले निकटचे नाते आहे असा दावा आपण करु लागतो. म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी आराधनेची खरी फुले आपण त्यांच्या चरणांपाशी आणतो.

ही आपल्या सद्गुणांची आठ फुले आहेत. ती दररोज फुलत असतात. ही खरी पाद्यपूजा त्यांना आवडते. निसर्गातील फुले कोमेजतात आणि सुकून जातात पण ही आपल्या अंत:करणातील फुले मात्र नित्य वाढतात आणि पाद्यपूजेसाठी भगवंताला अत्यंत प्रिय अर्पणवस्तू असतात. ही फुले म्हणजे:

  1. अहिंसा – प्रेम आणि विचार, शब्द व कृतीतील अहिंसा.
  2. इंद्रिय निग्रह – इंद्रियांवर ताबा (इंद्रियांची शिस्त).
  3. सर्वभूतदयापुष्पम् – सर्वांबद्दल करुणा.
  4. क्षमा – सोशिकपणा.
  5. शांति – चित्ताचे समत्व.
  6. सत्य – सर्वांमध्ये असणारे सत्य.
  7. ध्यान – आपल्यातील दिव्यत्वाची जाणीव (नकारात्मक विचारणा, वाणी व कृतीविरुद्ध जागरुकता).
  8. तपस् – विचार, उच्चार आणि आचारातील एकत्व.
पादपूजा :

आपल्या सभोवार असणाऱ्या गरजू आणि आजारी माणसांची सेवा करणे म्हणजेच खरी पूजा होय. कारण परमेश्वर आपल्या सर्व सोबत्यांच्या हृदयामध्ये विराजमान/निवासी आहे. तो सर्वांतर्यामी आहे, तसेच तो आपल्या सेवेचा व समर्पणाचा स्वीकार करतो.

पादपूजा म्हणजे परमेश्वराच्या चरणांची पूजा करण्याचा विधी. स्वामी म्हणतात, “जग हे परमेश्वराचे शरीर आहे. चिंतक, योजक तसेच शास्त्रज्ञ इ. परमेश्वराचे मस्तक आहे. समाजाचे रक्षक उदा. पायदळ, नौदल अथवा वैमानिक परमेश्वराचे बाहू आहेत. व्यापारी समाज परमेश्वराच्या मांड्या आहेत आणि श्रमजीवी, गरीब आणि निम्नस्तरातील लोक परमेश्वराचे पाय आहेत.”

सर्वांची सेवा करणाऱ्यांची व सेवेच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न करणाऱ्यांची सेवा करणे म्हणजे पाद-पूजा होय आणि पादनमस्कार होय. बाबा म्हणतात, “अशा सेवेचे मी स्वागत करतो.”

सुप्रभातम् च्या पाचव्या कडव्यामध्ये आपण मनोमय कोशापर्यंत पोहोचलो आहोत, मनोमय शरीर हे आपले सूक्ष्म शरीर आहे.

मनोमय कोशात सर्व शक्ती आणि सर्व गुण सामावलेले आहेत. ते आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. सद्गुण आणि दुर्गुण त्याच्या चरणी अर्पण करतो. त्यामुळे तो (परमात्मा) आपणास सुधारु शकतो. हे कडवे सुंदर आहे. त्यांत सुगंध आणि रंगांनी परिपूर्ण अशा फुलांचे शब्दचित्र रेखाटले आहे व ती साईंच्या चरणकमलांवर अर्पण केली आहेत. या लहानशा व नाजुक चरणांची आपल्या हृदयात स्थापना केलीच पाहिजे. परमेश्वराच्या शिकवणीचे नित्य स्मरण हाच त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग आहे. हे कडवे आपल्या मनाला व सूक्ष्म शरीराला उत्साहित करते आणि पाद-पूजा करीत असताना आपल्याला आनंद देते. हे आपल्या अंतर्मनाला स्पर्श करते आणि परमेश्वराच्या दर्शनाची आपली उत्कंठा वाढविते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: