अलगी
अलगी
राजराज हा एक महान सम्राट होता. त्याने इ.स. ९८५- १०१४ या दरम्यान राज्य केले. संपूर्ण दक्षिण भारत व सिलोन त्याच्या अधिपत्याखाली होता. त्याचे फार मोठे आरमार होते. संपूर्ण मलेशिया, इंडोनेशिया, ब्रह्मदेशाच्या काही भागावर त्याचे राज्य होते. अशा सत्तेच्या वैभवाच्या शिखरावर असूनही तो देवासमोर अतिशय विनम्र होता.
एका देवळाशी संबंधित एक रोचक गोष्ट आहे. ते मंदिर इ.स.१००३ साली बांधण्यास सुरवात झाली आणि इ.स.१००९ मध्ये त्याची प्रतिष्ठापना झाली. चोल सम्राटांच्या शौर्यांचे व भक्तिचे हे स्मारक आजही उभे आहे. अजूनही ते दक्षिण भारताला भेट देणाऱ्या भारतीय व विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
अलगी (सुंदर कन्या) त्या गावाची एक म्हातारी स्त्री होती. ती अत्यंत पवित्र, विनम्र आणि विनयशील भगवद्भक्त होती. परंतु ती देवाकडून कधीही काही मिळण्याची अपेक्षा करीत नसे. ती स्वत:ला अशी कृपा प्राप्त होण्याच्या संदर्भात फार खालच्या दर्जाची समजत असे. ती आपल्या बरोबरच्या लोकांशी अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने वागत असे. सर्व माणसे त्याच एका परमेश्वराची पृथ्वीवरील दृश्य रूपे आहेत असे तिला वाटे, म्हणून मदतीची वा सेवेची छोटीशी गोष्ट करण्यासही ती कां कू करत नसे. विशेष करून साधु – सज्जनांसाठी जेव्हा काही करायची संधी मिळे तेव्हा सदैव तत्परतेने करत असे.
तिला समजले की राजा देवासाठी फार मोठे मंदिर बांधत आहे. दररोज ती मंदिराच्या जागी जाई व बांधकाम करणाऱ्या सुतार, गवंडी, शिल्पकार व वास्तुतज्ज्ञांना पाही, त्याच्या सेवेबद्दल तिला हेवा वाटे. आपण त्यांच्या कामात काहीतरी मदत करावी अशी तिची इच्छा होती. परंतु तिच्या वयाचा विचार करून तिला कोणी कामावर घेत नव्हते. तिचे निष्ठावान मन देवाच्या कामात उपयोगी होण्याचा मार्ग सतत शोधीत होते. बरोबरच्या लोकांबद्दलच्या तिच्या प्रेमाने तिला रस्ता दाखवला.
ती त्या बांधकामाच्या ठिकाणी सकाळच्या थंडगार हवेत, दुपारच्या रखरखीत उन्हात आणि संध्याकाळच्या वाऱ्यातही जात होती. तिने पाहिले होते की दुपारच्या कडक उन्हात श्रमिकांना फार तहान लागते आणि ते थकतात. त्यावेळी त्यांना मदत करायची तिने योजना आखली. आले, मोहरी कढिलिंब इत्यादि घातलेल्या ताकाची भांडी भरून ती कामाच्या ठिकाणी जायची आणि प्रत्येकाला एक कप थंड व उत्साहवर्धक मठ्ठा द्यायची. या गोष्टीचे सर्वांनी स्वागत केले. या विचारपूर्वक केलेल्या सेवेबद्दल सर्वांनी धन्यवाद दिले. ते थंड पेय सर्वांना उत्साहित करीत असे आणि ते न दमता उरलेल्या दिवसाच्या उरलेल्या भागात काम चालू ठेवू शकत असत.
ही सेवा ती बरेच दिवसांपासून करत होती. शेवटी हे बांधकाम पूर्ण होण्याची वेळ आली. दोनशे सोळा फूट उंचीवरचा मुख्य मंदिरावरील कळस पूर्ण होत आला. तिला एक कल्पना सुचली. “मित्रहो, मला एक लहानशी विनंती करायचीय तुम्हाला. तुम्ही या म्हातारीची ही विनंती कृपाळूपणे मान्य कराल काय?” असे तिने त्यांना विचारले.
ते शिल्पकार आणि कारागीर यांना त्या म्हातारीबद्दल कृतज्ञता आणि आदर वाटत असे. कारण गेली कित्येक वर्ष ती म्हातारी या सर्वांवर खूप माया करीत असे, आणि म्हणून म्हतारीने काहीही विनंती केली तरी ती मानायला ते साहजिकच तयार होते. त्यांचा म्होरक्या म्हणाला, “आजीबाई, तू नुसते सांगायचं अवकाश, आम्ही तुझी विनंती आनंदाने पार पडू.”
ती म्हणाली, “माझ्या अंगणात एक खूप मोठा काळा दगड पडून आहे. मला त्याचा काहीच उपयोग नाही. कळसावर लावण्यासाठी उपयोग होईल, हे पहा, मलाही ईवराची सेवा करायची इच्छा आहे. तुम्ही तो दगड इकडे आणून वरच्या स्तरासाठी त्याचा वापर कराल काय? मग मला समाधान मिळेल.”
आम्ही आजच तसे करू.” तो म्हणाला. आपल्या कामगारांच्या गटांसह तो तिच्या घरी गेला. त्याने पाहिले की तो दगड पुरेशा आकारमानाचा होता. त्याने तो दगड मंदिरापाशी आणून छिन्नीने तासला आणि लवकरच मंदिराच्या कळसावर बसविला.
सर्व बांधकाम पूर्ण झाले आणि राजपुरोहिताने मंदिराच्या उदघाटनासाठी एक शुभ दिवस निवडला. राजाने आपल्या शिरस्ताप्रमाणे आदल्यादिवशी सर्व बांधकामाची पाहाणी केली आणि इतके सर्वांगसुंदर आणि भव्य शिवमंदिराचे काम एकदाचे पूर्ण झाले हे पाहून तो खुषीत होता. त्याला साहजिकच अभिमान वाटला की ईश्वराने इतक्या मोठ्या कामासाठी साधन म्हणून त्याची निवड केली होती. ते मंदिर आता ‘महामंदीर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
सर्व काही ठीकठाक आहे याची खात्री करुन राजाने दुसऱ्या होणाऱ्या प्रतिष्ठापना विधीबद्दल शेवटल्या काही सूचना आपल्या मंत्र्यांना दिल्या आणि तो राजवाड्यात परतला. रात्री त्याला स्वप्न पडले आणि त्यात प्रत्यक्ष भगवान शिवाने, बृहदीश्वराने त्याला दर्शन दिले.
भगवान त्याला म्हणाले, “राजा, त्या म्हाताऱ्या अलगीने दिलेल्या निवाऱ्यामुळे महामंदिरात कायमचा वास करायला आम्हाला आनंद होत आहे
राजा खडबडून जागा झाला. त्याचा कानावर विश्वास बसेना. भगवान एक म्हातारीने दिलेल्या निवाऱ्यामध्ये निवास करणार? शक्यच नाही! राजाने तर स्वत: ते मंदिर बांधवून घेतलेले. सर्व आराखडा, कल्पना साहित्यांची जुळवाजुळव, मजूर-गवंडी, कारागीर हे सर्व तरसाहित्यांची जुळवाजुळव, मजूर-गवंडी, कारागीर हे सर्व तर त्याने स्वत: लावलेले. इतर कोणी नाही, कुठल्याही म्हातारीचा यात काही संबंध नाही, नव्हता. पण ईश्वरच तसे म्हणाला. मग ते खरे असलेच पाहिजे.
अत्यंत नम्रतेने राजा मंदिरात गेला आणि या मंदिराच्या बांधकामात कोणत्या म्हातारीचासहभाग मिळाला याचा शोध त्याने सुरू केला. पण अशी कोणी म्हातारी होती असे दिसेना. त्या म्हातारीची चौकशी करण्याची आज्ञा त्याने मंत्र्यांना दिली. खूप विस्ताराने चौकशी केल्यावर त्यांना तिची हकीकत कळली. त्यांना समजले की अलगी नावाची ही म्हातारी त्या मजुरांमध्ये फिरून त्यांना दररोज उन्हाच्या वेळी थंडगार ताक वाटीत असे आणि काम चालू असताना दगडही पुरविले.
राजाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. अरेच्या, म्हणजे म्हातारीच्या या लाहनशा सेवेनेही ईश्वर इतका प्रसन्न झाला की म्हातारीने दिलेल्या निवाऱ्यामुळे आनंदात आहे असे म्हणाला.
राज हात जोडून म्हातारीच्या झोपडीत गेला. तिला आदराने त्याने मंदिरात आणले, सर्वांसमोर तिचा सत्कार केला आणि नंतर प्रतिष्ठापनाचे विधी सुरू झाले. नेहमीप्रमाणेच अलगीने विनम्रपणे ईश्वराला वंदन झाले, तिने केलेल्या इवल्याशा सेवेचेही ईश्वराने कौतुक केलेम्हणून मनोमन समाधान मानीत ती ईश्वर आणि भक्त यांची सेवा नंतरही करीतच राहिली. तिच्या लहानश्या सेवेचेही परमेश्वराने केलेले कौतुक पाहून लोक चकित झाले. तिची गाथा तेथील लोकगीते आणि कंठात यायला लागली. ती जिथे राहत होती त्या जागेला यालागी बाग असे नाव पडले आणि समोरच्या तलावाला यालागी जलाशय असे नाव पडले. अकराव्या शतकात जिथे तिची झोपडी होती तेथे आता एकवीशव्या शतकात नगरपालिका कार्यालय आहे.
प्रश्न
- अलगी कोण होती?
- ती कशाप्रकारची सेवा करून मंदिर बांधणीच्या बाबतीत उपयोगी उरली?
- तिची एकुलती एक इच्छा काय होती?
- इश्वराने राजाला स्वप्नात काय सांगितले?
- अलगीच्या गोष्टीपासून राजराजाने कोणता धडा घेतला?
[Source- Stories for Children- II
Published by- Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]